S M L

केंद्राशी बोला, पण अर्थसंकल्पापूर्वीच कर्जमाफी जाहीर करा ; शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Sachin Salve | Updated On: Mar 16, 2017 05:55 PM IST

केंद्राशी बोला, पण अर्थसंकल्पापूर्वीच कर्जमाफी जाहीर करा ; शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा

16 मार्च : अर्थसंकल्पापूर्वी कर्जमाफी द्या, त्याशिवाय अर्थसंकल्प मांडू देणार नाही, या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे. केंद्र सरकारशी बोलून फडणवीसांनी लवकर निर्णय घ्यावा, असा इशाराच शिवसेनेनं मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलंय.

कर्जमाफी संदर्भात विधिमंडळात आज (गुरुवारी) मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनावर शिवसेनेनं नाराजी व्यक्त करत कर्जमुक्ती संदर्भात ठोस निर्णय होत नाही, तो पर्यंत अर्थसंकल्प मांडला जाऊ नये अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.

दरम्यान, शिवसेनेची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे. आम्ही जेव्हा विरोधी पक्ष होतो तेव्हाही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा आणि कर्जमाफी द्यावी ही उद्धव ठाकरेंची यांची भूमिका आजही कायम आहे. मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन दिलं. जो काही निधी लागणार आहे. तो शेतकऱ्यांच्या जिवापेक्षा मोठा नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने दोघांनी मिळून शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी द्यावा अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन यावर ठोस निर्णय घ्यावा आणि अर्थसंकल्पाच्या आधी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा असं ही एकनाथ शिंदे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2017 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close