S M L

मुख्यमंत्र्यांची मागणीच हास्यास्पद, राजू शेट्टींचा टोला

Sachin Salve | Updated On: Mar 16, 2017 06:17 PM IST

मुख्यमंत्र्यांची मागणीच हास्यास्पद, राजू शेट्टींचा टोला

raju_shetty_on_cm16 मार्च : कर्जमाफी दिली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील याची हमी द्या, ही मुख्यमंत्र्यांची मागणी हास्यास्पद आहे अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलीये.

कर्जमाफी आवश्यक आहेच पण त्यासाठी लागणारा पैसा दिला तर कारभार करण्यासाठी पैसाच राहणार नाही अशी भूमिका आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडलीय. तसंच बँकेतील घोटाळे लपवण्यासाठी विरोधकांना कर्जमाफी हवी आहे. कर्जमाफी केल्यावर शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी विरोधक देणार का असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय. फडणवीसांच्या या मागणीवर भाजपचं मित्रपक्ष असलेल्या  राजू शेट्टी यांनी टीका केलीय.

मुळात मुख्यमंत्र्यांची मागणीच हास्यास्पद आहे. एक जबाबदार शेतकरी नेता म्हणून मला ही माहिती आहे की कर्जमुक्ती हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर अंतिम उपाय नाही. परंतु, जेव्हा दवाखान्यामध्ये एक अत्यवस्थ रुग्ण जातो. तेव्हा त्याला सलाईन लावली जाते. आणि मग पुढेचे उपचार दिले जातात. त्यामुळे मरणासन्न झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा सक्रीय करण्यासाठी त्याला कर्जमुक्तीचं सलाईन देणं आवश्यक आहे असंही राजू शेट्टी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2017 06:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close