S M L

महालक्ष्मीची चरणी होणार तब्बल 22.5 किलोची सुवर्णपालखी

Sonali Deshpande | Updated On: Mar 16, 2017 07:15 PM IST

महालक्ष्मीची चरणी होणार तब्बल 22.5 किलोची सुवर्णपालखी

16 मार्च : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीला आता सोन्याची पालखी अर्पण केली जाणार आहे. तब्बल 22. 5 किलो वजनाची ही पालखी असून गेल्या 2 वर्षांपासून या पालखीचं काम सुरू होतं.

कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्ट स्थापन करण्यात आला होता. या ट्रस्टमार्फत भाविकांना सोनं दान करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याप्रमाणे भाविकांनीही अगदी 1 ग्रॅमपासून ते 1 किलोपर्यंत सोनं पालखीसाठी दिलं.त्यानंतर उद्यमनगरमध्ये हे काम सुरू होतं. आता या पालखीचं काम पूर्ण झालं असून येत्या शनिवारी या पालखीची विधीवत पूजा आणि शिबिकाविधी करण्यात येणार आहे. त्यानंतर ही पालखी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडं सूपुर्त करण्यात येईल.

यापूर्वीच साडेतीन किलो वजनाचे 2 मोर्चेल आणि 2 चवरी या देवस्थान समितीकडे सूपूर्त करण्यात आल्या आहेत. या पालखीवर करवीर संस्थानातल्या 18 देवांच्या प्रतिकृती असून 8 मांगलिक चिन्हंही कोरण्यात आली आहेत. या पालखीचं रूप अतिशय देखणं असून पूर्णपणे सोन्याची पालखी बनवण्यात आल्यानं भक्तांमध्येही आता उत्साहाचं वातावरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2017 07:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close