S M L

नागपुरात खोदलेले रस्ते पावसाळ्यातही जैसे थे

21 जूननागपूर शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. पावसाळ्याच्या आधी हे सर्व खड्डे बुजवायचे होते. पण पावसाळा सुरू झाल्यानंतरही हे काम जैसे थे आहे. यावर महापालिका काहीच करताना दिसत नाही. काही वर्षांपूर्वीच आयआरडीपीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून नागपुरातील रस्ते तयार करण्यात आले होते. आणि आता हे सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत.नागपूरच्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर रस्त्यावर पाणी साचल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. कोल्हापुरात तातडीची बैठककोल्हापूर महापालिकेचे रस्ते विकास महामंडळाचे काम अगदी संथ गतीने सुरू आहे. 'आयबीएन - लोकमत'ने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे नामदार हसन मुश्रीफ यांनी आज महापालिका आधिकार्‍यांनी तातडीची बैठक बोलावली.गेल्या अनेक दिवसापासून शहारातील नागरीक खराब रस्त्यांचा त्रास सहन करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 21, 2010 01:57 PM IST

नागपुरात खोदलेले रस्ते पावसाळ्यातही जैसे थे

21 जून

नागपूर शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे.

पावसाळ्याच्या आधी हे सर्व खड्डे बुजवायचे होते. पण पावसाळा सुरू झाल्यानंतरही हे काम जैसे थे आहे. यावर महापालिका काहीच करताना दिसत नाही.

काही वर्षांपूर्वीच आयआरडीपीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून नागपुरातील रस्ते तयार करण्यात आले होते. आणि आता हे सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत.

नागपूरच्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर रस्त्यावर पाणी साचल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

कोल्हापुरात तातडीची बैठक

कोल्हापूर महापालिकेचे रस्ते विकास महामंडळाचे काम अगदी संथ गतीने सुरू आहे. 'आयबीएन - लोकमत'ने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे नामदार हसन मुश्रीफ यांनी आज महापालिका आधिकार्‍यांनी तातडीची बैठक बोलावली.

गेल्या अनेक दिवसापासून शहारातील नागरीक खराब रस्त्यांचा त्रास सहन करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2010 01:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close