S M L

एक दिवस अन्नदात्यासाठी राज्यभर उपवास

Sonali Deshpande | Updated On: Mar 19, 2017 01:41 PM IST

एक दिवस अन्नदात्यासाठी राज्यभर उपवास

19 मार्च : गेल्या वर्षभरात राज्यात जवळपास 3 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा सरकारचाच आकडा आहे. 19 मार्च 1986 रोजी यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगव्हाण गावात साहेबराव करपे यांनी त्यांची दोन मुलं आणि पत्नीसह आत्महत्या केली होती.त्या आत्महत्येला आज 31 वर्षे पूर्ण होतायत. त्यासाठी आज राज्यात सगळीकडे उपवास करण्यात येणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव इथं मुख्य उपोषण सकाळी 10 ते संध्याकाळी 6पर्यंत असणार आहे.तर चिलगव्हाणमध्ये साहेबरावॆ पाटील करपे यांची श्रद्धांजली सभा होणार आहे.तसंच घरोघरी पांढरी रांगोळी आणि त्यात काळे ठिपके काढून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे आणि नेर तालुक्यातील सातेफल गावातही घरोघरी रांगोळी काढून आंदोलन करणार आहेत.

या उपोषणात राज्यातील विविध राजकीय नेते सहभागी होतील.अमर हबीब यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येणार असून राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांचा सहभाग राहणार आहे.तसंच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि पत्रकारही सहभागही होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2017 01:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close