S M L

मढी यात्रेत भरलाय गाढवांचा बाजार

Sonali Deshpande | Updated On: Mar 19, 2017 03:57 PM IST

मढी यात्रेत भरलाय गाढवांचा बाजार

साहेबराव कोकणे, 19 मार्च : नगरच्या मढी यात्रेला उत्साहात सुरूवात झालीय. राज्यासह परराज्यातूनही लाखो भाविक चैतन्य कानिफनाथांच्या संजिवन समाधीचं दर्शन घेण्यासाठी येतात.या यात्रेचं अजून एक वैशिष्ट्यं म्हणजे इथं भरणारा गाढवांचा बाजार.

नगरच्या मढी यात्रेला भटक्यांची पंढरी म्हणून ओळखलं जातं. अठरापगड जातींना यात्रेत मान-पान मिळतो. मानाची होळी पेटल्यानंतर मढी यात्रौत्सवास सुरुवात होते. १५ दिवस हा यात्रौत्सव चालतो . पंचमीच्या दिवशी मुख्य यात्रौत्सवाला सुरूवात झाली..

मढी यात्रेचं वैशिष्ट्ये म्हणजे इथं भरणारा गाढवांचा बाजार.हा गाढवांचा बाजार आठवडाभर चालतो.. या बाजारात गाढवांच्या महाराष्ट्रीयन आणि गुजराती अशा दोन जातींना प्रमुख मागणी असते. गुजरातमधून यंदा या बाजारात विक्रीसाठी 300 गाढवं आलीयत. तर चार दिवसांत तब्बल दीडशे गाढवांची विक्री झालीय.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या मढी यात्रेचं आकर्षण आहे.यात्रेची ही दृश्य बघितली तर भटक्यांच्या या पंढरीचा फेरफटका मारायचा मोह आवरणार नाही एवढं मात्र नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2017 03:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close