S M L

खडतर डोंगरात रंगली आॅल टेरियन व्हेइकल्स चॅम्पियनशीप स्पर्धा

Sonali Deshpande | Updated On: Mar 19, 2017 04:54 PM IST

खडतर डोंगरात रंगली आॅल टेरियन व्हेइकल्स चॅम्पियनशीप स्पर्धा

19 मार्च : अहमदनगरला ऑल टेरियन व्हेइकल्स चॅम्पियनशीप स्पर्धा नुकतीच पार पडली. देशभरातील तब्बल ७३ संघानी स्पर्धेत सहभाग घेतला होता. अत्यंत खडतर डोंगराळ भागात दिवस आणि रात्रीच्या अंधारात स्पर्धा रंगली.

एटीव्ही चॅम्पियनशीपसाठी विळद घाटात सहा किलोमीटरचा ट्रॅक बनवला होता. तीन दिवस ही स्पर्धा चालली.डॉक्टर विखे पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी गाड्या बनवून सहा प्रकारच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. प्रत्येक संघात तीस विद्यार्थ्यांचा समावेश होता. नियमानुसार गाड्या तयार केल्या.

आगप्रतिबंधक यंत्र, इंजीनची क्षमता, सीट बेल्टसह सुरक्षेची काळजी घेण्यात आलीय. सहा लाखापासून तेरा लाखापर्यंत या गाड्यांना खर्च आलाय. या गाड्यांच्या क्षमतेचा कस स्पर्धेत लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2017 04:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close