S M L

मुजोर रिक्षाचालकाची महिला होमगार्डला मारहाण

Sonali Deshpande | Updated On: Mar 19, 2017 07:52 PM IST

मुजोर रिक्षाचालकाची महिला होमगार्डला मारहाण

19 मार्च : डोंबिवलीमध्ये एका मुजोर रिक्षाचालकाने ड्युटीवर असलेल्या महिला होमगार्डला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडलीय. याबद्दल या रिक्षाचालकाच्या विरोधात रामनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या चालकाला नंतर अटक करण्यात आलीय.

रामनगर पोलीस स्थानकाजवळ रेल्वे स्टेशन परिसरात तैनात असेलेल्या या होमगार्ड महिलेने एका रिक्षाचालकाने चुकीच्या पद्धतीने रिक्षा उभी केल्याबद्दल त्याला जाब विचारला. त्यानंतर या रिक्षाचालकाने या महिलेशी वाद घालायला सुरूवात केली. वाद वाढल्यानंतर या महिलेने रिक्षाचालकाच्या रिक्षात बसून रिक्षा ट्राफिक कार्यालयात न्यायला सांगितलं. मात्र रिक्षाचालकाने भरधाव वेगाने रिक्षा कचोरे गावाच्या दिशेने ९० फिट रस्त्यावर नेली. ९० फिट रस्त्यावर रिक्षा थांबवून त्याने त्या महिलेला मारहाण करायला सुरूवात केली. त्यानंतर तिला रिक्षातून खाली ढकलून तो पसार झाला.

या महिला होमगार्डवर नंतर प्राथमिक उपचार करून तिला घरी सोडण्यात आलं. तर रिक्षाचालक रवी गुप्ताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2017 07:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close