S M L

बुलडाण्यात भाजपचा सेनेला दे धक्का, जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादीसोबत युती

Sachin Salve | Updated On: Mar 20, 2017 06:06 PM IST

बुलडाण्यात भाजपचा सेनेला दे धक्का, जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादीसोबत युती

20 मार्च : जिल्हा परिषदेत भाजपला अडचणीत आणण्याची ऐक ऐक संधी शिवसेना सोडत नसताना आता भाजपनंही तशीच रणनिती आखलीये. बुलडाण्यात शिवसेना अनुकूल असतानाही भाजपनं सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेतून बाहेर फेकली गेलीये.

बुलढाणा जिल्हा परिषदेसाठी निवडणूक झाली होती. 60 जागा साठी ही निवडणूक होती. त्यात भाजपला 24 ठिकाणी विजयी मिळवला. पण स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे भाजपला सत्ता स्थापनेसाठी कुणाची साथ घ्यावी लागणार होती. पण भाजप शिवसेनेची साथ घेईल अशी चर्चा होती.  पण कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी राष्ट्रवादीशी सूत जुळवलंय. सत्ता स्थापनेसाठी युती करु हे सांगण्यासाठी सेनेचं कोणच आलं नाही असं फुंडकर यांनी यावर सांगितलं.

एकेकाळी भाजप-शिवसेना मांडीला मांडी लाऊन बसत असल्याचे पहावयास मिळत होते पण आता सत्तेसाठी भाजपने नवीन खेळी करत राष्ट्रवादीला सोबत घेतले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2017 06:06 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close