S M L

मंत्रालय होणार बुलेटप्रुफ

22 जूनमंत्रालयाची सुरक्षा व्यवस्था ढिसाळ झाल्याची बातमी 'आयबीएन-लोकमत'ने पहिल्यांदा दाखवली होती. त्यानंतर आता सरकारने मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाभोवती 8 फूट उंचीची बुलेटप्रुफ वॉल बांधण्यात येणार आहे. रिझर्व बँकेच्या भिंतीच्या धर्तीवर ही भिंत बांधण्यात येणार आहे. तसेच 15 फूट उंचीचे सुरक्षा टॉवर्स सहा ठिकाणी उभारले जाणार आहेत. या टॉवर्सवरून मंत्रालयावर कमांडोंचा 24 तास पहारा राहणार आहे. मंत्रालयात येणार्‍या व्हिजिटर्ससाठी नवी पास व्यवस्था अमलात आणली जाईल. त्यानुसार फोटो आयडेंटीटी पासेस दिले जातील. तसेच मंत्रालयात नियमित येणार्‍या गाड्यांना रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडी कार्ड दिले जातील. मंत्रालयातील काही गेट्स बंद केली जाणार आहेत. तर सुरू ठेवण्यात येणार्‍या गेट्सवर नव्या स्कॅनिंग मशिन्स बसवण्यात येणार आहेत. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही घोषणा केली आहे. या तरतुदींचा 10 कोटी रुपयांचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 22, 2010 05:45 PM IST

मंत्रालय होणार बुलेटप्रुफ

22 जून

मंत्रालयाची सुरक्षा व्यवस्था ढिसाळ झाल्याची बातमी 'आयबीएन-लोकमत'ने पहिल्यांदा दाखवली होती. त्यानंतर आता सरकारने मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंत्रालयाभोवती 8 फूट उंचीची बुलेटप्रुफ वॉल बांधण्यात येणार आहे. रिझर्व बँकेच्या भिंतीच्या धर्तीवर ही भिंत बांधण्यात येणार आहे. तसेच 15 फूट उंचीचे सुरक्षा टॉवर्स सहा ठिकाणी उभारले जाणार आहेत. या टॉवर्सवरून मंत्रालयावर कमांडोंचा 24 तास पहारा राहणार आहे.

मंत्रालयात येणार्‍या व्हिजिटर्ससाठी नवी पास व्यवस्था अमलात आणली जाईल. त्यानुसार फोटो आयडेंटीटी पासेस दिले जातील. तसेच मंत्रालयात नियमित येणार्‍या गाड्यांना रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडी कार्ड दिले जातील. मंत्रालयातील काही गेट्स बंद केली जाणार आहेत.

तर सुरू ठेवण्यात येणार्‍या गेट्सवर नव्या स्कॅनिंग मशिन्स बसवण्यात येणार आहेत. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही घोषणा केली आहे. या तरतुदींचा 10 कोटी रुपयांचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2010 05:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close