S M L

'सरकार 3' 7 एप्रिलऐवजी 12मे रोजी होणार रिलीज

Sonali Deshpande | Updated On: Mar 22, 2017 05:54 PM IST

'सरकार 3' 7 एप्रिलऐवजी 12मे रोजी होणार रिलीज

22 मार्च : 'सरकार 3' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलीये.सिनेमा आधी 7 एप्रिल रोजी रिलीज होणार होता पण पोस्ट प्राॅडक्शनचं काही काम शिल्लक असल्यामुळे सिनेमा आता 12 मे रोजी रिलीज होणार आहे.सिनेमाच्या निर्मात्यांनी ही बातमी सोशल मीडियावरून नुकतीच जाहीर केलीये.

आता यामुळे खूप मोठा गोंधळ बॉक्स ऑफिसवर निर्माण होणारेय. कारण रणबीर-कॅटचा 'जग्गा जासूस', परिणीती-आयुष्यमानचा 'मेरी प्यारी बिंदू' आणि इरफान खानचा 'हिंदी मीडियम'ही याच तारखेला बॉक्स ऑफिसवर एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. इतके मोठे सिनेमे एका वेळी रिलीज झाले की थिएटर्स मिळण्याचाही प्रश्न निर्माण होतो.आणि प्रेक्षकही विभागला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 22, 2017 05:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close