S M L

भाजप कोअर कमिटीची आज बैठक, सेनेच्या वागणुकीवर होणार चर्चा

Sachin Salve | Updated On: Mar 22, 2017 06:47 PM IST

bjp-pradarshan22 मार्च : भाजपच्या कोअर कमिटीची महत्वाची बैठक आज (बुधवारी) रात्री आठ वाजता पार पडणार आहे. या बैठकीत शिवसेनेने सरकारविरोधी घेतलेल्या भूमिकेवर चर्चा होणार असल्याचं कळतंय.

विधिमंडळाबाहेर अर्थसंकल्पाची होळी करणाऱ्या १९ आमदारांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर शिवसेनेने त्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेऊन हे निलंबन मागे घेण्याची मागणी केली. वारंवार शिवसेनेकडून सरकारविरोधी भूमिका घेतली जात असल्यामुळे शिवसेनेला पर्याय शोधण्याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजप यासाठी आपला प्लान बी तयार करतोय. शिवसेनेच्या या वागण्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढलेली असून त्यावर कायमचा उपाय शोधण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 22, 2017 06:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close