S M L

औरंगाबाद महापालिका गोंधळ अहवाल राज्य सरकारकडे

23 जूनऔरंगाबाद महापालिकेतील गोंधळाचा अहवाल राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे. वातावरण निवळले नाही, तर औरंगाबाद महापालिका बरखास्त करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून पुढे येत आहे. औरंगाबाद महापालिकेत याआधीही असे हिंसक संघर्ष झाले आहेत. मात्र महापालिका बरखास्तीपर्यंत चर्चा झाली नव्हती. यावेळी मात्र मनपाच्या बरखास्तीची मागणी विरोधकांकडून होत आहे. तसे वातावरणही निर्माण केले जात आहे. या सगळ्याचा विचार करता, औरंगाबादमधील संघर्षाचे कारण दाखवत आणि मनपा आयुक्तांच्या अहवालाचा संदर्भ देत, मुख्यमंत्री पालिका बरखास्त करणार का? अशीही चर्चा रंगू लागली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2010 10:28 AM IST

औरंगाबाद महापालिका गोंधळ अहवाल राज्य सरकारकडे

23 जून

औरंगाबाद महापालिकेतील गोंधळाचा अहवाल राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे.

वातावरण निवळले नाही, तर औरंगाबाद महापालिका बरखास्त करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून पुढे येत आहे.

औरंगाबाद महापालिकेत याआधीही असे हिंसक संघर्ष झाले आहेत. मात्र महापालिका बरखास्तीपर्यंत चर्चा झाली नव्हती. यावेळी मात्र मनपाच्या बरखास्तीची मागणी विरोधकांकडून होत आहे.

तसे वातावरणही निर्माण केले जात आहे. या सगळ्याचा विचार करता, औरंगाबादमधील संघर्षाचे कारण दाखवत आणि मनपा आयुक्तांच्या अहवालाचा संदर्भ देत, मुख्यमंत्री पालिका बरखास्त करणार का? अशीही चर्चा रंगू लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2010 10:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close