S M L

अखेर टॅक्सीभाडे वाढले

23 जूनरिक्षा भाडेवाढीनंतर आता मुंबईकरांना टॅक्सी भाडेवाढीचा झटका बसणार आहे. अखेर टॅक्सीच्या भाड्यात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. किमान भाडे 14 रुपयांवरुन 16 रुपये झाले आहे. तर त्यापुढच्या प्रत्येक युनिटसाठी एक रुपया भाडेवाढ करण्यात आली आहे. 27 जूनपासून ही दरवाढ लागू करण्यात येणार आहे. दरम्यान कालच्याप्रमाणे आज सकाळपासून काही अज्ञात इसमांनी टॅक्सी रोखल्याने मुंबईत आजही रस्त्यांवर टॅक्सी दिसत नव्हत्या. नागपाडा, आग्रीपाडा, सायन, वरळी भागात असे प्रकार दिसले. टॅक्सींची तोडफोड होईल या भीतीने टॅक्सीचालकांनी आज टॅक्सी चालवल्या नाहीत. पण टॅक्सी संघटनेने संप पुकारला नसल्याचा दावा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष ए. एल. क्वॉड्रोस यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2010 11:45 AM IST

अखेर टॅक्सीभाडे वाढले

23 जून

रिक्षा भाडेवाढीनंतर आता मुंबईकरांना टॅक्सी भाडेवाढीचा झटका बसणार आहे. अखेर टॅक्सीच्या भाड्यात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

किमान भाडे 14 रुपयांवरुन 16 रुपये झाले आहे. तर त्यापुढच्या प्रत्येक युनिटसाठी एक रुपया भाडेवाढ करण्यात आली आहे. 27 जूनपासून ही दरवाढ लागू करण्यात येणार आहे.

दरम्यान कालच्याप्रमाणे आज सकाळपासून काही अज्ञात इसमांनी टॅक्सी रोखल्याने मुंबईत आजही रस्त्यांवर टॅक्सी दिसत नव्हत्या.

नागपाडा, आग्रीपाडा, सायन, वरळी भागात असे प्रकार दिसले. टॅक्सींची तोडफोड होईल या भीतीने टॅक्सीचालकांनी आज टॅक्सी चालवल्या नाहीत.

पण टॅक्सी संघटनेने संप पुकारला नसल्याचा दावा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष ए. एल. क्वॉड्रोस यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2010 11:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close