S M L

कंगना अवतरली 70च्या लुकमध्ये

पिया हिंगोरानी, मुंबई24 जूनहृतिक रोशनच्या काईट्स सिनेमातील डान्सनंतर कंगना राणावत आता परतली आहे, ती 70 च्या लुकमध्ये...वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई या सिनेमात कंगनाचा हा नवा लुक आपल्याला बघायला मिळणार आहे... 70चा काळ आता परत आला आहे..आणि हे फक्त ऍश आणि अक्षय कुमारच्या आगामी सिनेमा ऍक्शन रिप्लेबद्दल नाही तर कंगना राणावतसुद्धा तिच्या आगामी सिनेमात 70 च्या दशकातलं ग्लॅमर घेऊनआपल्यासमोर येतेय... वन्स अपॉन अ टाईम हा सिनेमा मिलन लुथरियानं दिग्दर्शित केला आहे..ज्यामध्ये सत्तरीच्या दशकातल्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रकाश टाकण्यात आला आहे...या सिनेमाचं शूटींग कंगनासाठी तितकं सोपं नव्हतं..सगळ्यात कठीण होतं ते सिनेमाचं लोकेशन्स शोधणं..कारण मुंबई अतिशय गजबजलेली आहे..आणि आम्हाला 70चा काळ उभारायचा होता..त्यामुळे मॉबलाही तसं ड्रेसींग करावं लागलं...आताच्या काळातला कोणी दिसणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी लागली.. तसंच गाड्याही त्या काळातल्याच वापराव्या लागल्या, असं कंगना सांगते... 70च्या दशकातील या व्यक्तिरेखेसोबतच कंगना अनेक आगामी सिनेमांत विविध भूमिकांमधून दिसणार आहे. वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई हा सिनेमा येत्या 30 जुलैला रिलीज होत आहे..कंगनासह अजय देवगण, इम्रान हाश्मी आणि प्राची देसाई हे कलाकार यात पाहायला मिळतील...

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 24, 2010 11:12 AM IST

कंगना अवतरली 70च्या लुकमध्ये

पिया हिंगोरानी, मुंबई

24 जून

हृतिक रोशनच्या काईट्स सिनेमातील डान्सनंतर कंगना राणावत आता परतली आहे, ती 70 च्या लुकमध्ये...वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई या सिनेमात कंगनाचा हा नवा लुक आपल्याला बघायला मिळणार आहे...

70चा काळ आता परत आला आहे..आणि हे फक्त ऍश आणि अक्षय कुमारच्या आगामी सिनेमा ऍक्शन रिप्लेबद्दल नाही तर कंगना राणावतसुद्धा तिच्या आगामी सिनेमात 70 च्या दशकातलं ग्लॅमर घेऊनआपल्यासमोर येतेय...

वन्स अपॉन अ टाईम हा सिनेमा मिलन लुथरियानं दिग्दर्शित केला आहे..ज्यामध्ये सत्तरीच्या दशकातल्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रकाश टाकण्यात आला आहे...या सिनेमाचं शूटींग कंगनासाठी तितकं सोपं नव्हतं..

सगळ्यात कठीण होतं ते सिनेमाचं लोकेशन्स शोधणं..कारण मुंबई अतिशय गजबजलेली आहे..आणि आम्हाला 70चा काळ उभारायचा होता..त्यामुळे मॉबलाही तसं ड्रेसींग करावं लागलं...आताच्या काळातला कोणी दिसणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी लागली.. तसंच गाड्याही त्या काळातल्याच वापराव्या लागल्या, असं कंगना सांगते...

70च्या दशकातील या व्यक्तिरेखेसोबतच कंगना अनेक आगामी सिनेमांत विविध भूमिकांमधून दिसणार आहे.

वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई हा सिनेमा येत्या 30 जुलैला रिलीज होत आहे..कंगनासह अजय देवगण, इम्रान हाश्मी आणि प्राची देसाई हे कलाकार यात पाहायला मिळतील...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2010 11:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close