S M L

जसवंत सिंग भाजपमध्ये परतले

24 जूनजीना प्रकरणावरून बडतर्फ करण्याते आलेले भाजप नेते जसवंत सिंग यांना आज पक्षात परत प्रवेश देण्यात आला. भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत जसवंत सिंग यांनी पक्षात प्रवेश केला. जसवंत यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी अडवाणी यांनी पुढाकार घेतला होता. नितीन गडकरी यांचीही तीच इच्छा होती. साधारण नऊ महिन्यापूर्वी भाजपच्या चिंतन बैठकीत, जसवंतसिंग यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला होता. आपल्या पुस्तकातून त्यांनी पाकिस्तानचे जनक बॅरिस्टर मोहम्मद अली जीना यांची स्तुती, तर सरदार पटेल यांच्यावर टीका केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 24, 2010 03:48 PM IST

जसवंत सिंग भाजपमध्ये परतले

24 जून

जीना प्रकरणावरून बडतर्फ करण्याते आलेले भाजप नेते जसवंत सिंग यांना आज पक्षात परत प्रवेश देण्यात आला.

भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत जसवंत सिंग यांनी पक्षात प्रवेश केला.

जसवंत यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी अडवाणी यांनी पुढाकार घेतला होता. नितीन गडकरी यांचीही तीच इच्छा होती. साधारण नऊ महिन्यापूर्वी भाजपच्या चिंतन बैठकीत, जसवंतसिंग यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला होता.

आपल्या पुस्तकातून त्यांनी पाकिस्तानचे जनक बॅरिस्टर मोहम्मद अली जीना यांची स्तुती, तर सरदार पटेल यांच्यावर टीका केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2010 03:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close