S M L

नारायण राणे दिल्लीत दाखल

Sachin Salve | Updated On: Mar 28, 2017 01:20 PM IST

नारायण राणे दिल्लीत दाखल

27 मार्च : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेनंतर आता राणे यांनी दिल्ली गाठली आहे. पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेणार आहे.

"भूकंप सांगून येत नाही तो अचानक होतो" असा स्पष्ट संकेत देणारे नारायण राणे भाजप प्रवेशाचा निर्णय घेऊन मोठा राजकीय भूकंप करतील अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्याच दुसरा अध्याय सुरू झालाय. नारायण राणे दिल्लीत दाखल झाले आहे.. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात त्यांनी मोहीम उघडली आहे. राणे आता पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार आहे.

2005 साली शिवसेना सोडताना नारायण राणेंनी अशाच प्रकारची पक्षविरोधी वक्तव्य करत शिवसेनेला कारवाई करण्यास भाग पाडल होतं. आणि त्यामुळे राणेंना आपल्या काँग्रेस प्रवेशाच निमित्त मिळाल होतं. यावेळी काँग्रेसने जर असाच कारवाईचा बडगा उगारला तर तो राणेंच्या पथ्यावरच पडणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2017 10:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close