S M L

भोपाळ गॅस पीडितांच्या पॅकेजला मान्यता

24 जूनभोपाळ गॅस दुर्घटनेप्रकरणी मंत्रिगटाने केलेल्या शिफारसी केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकारल्या आहेत. दुर्घटनेच्या तब्बल 26 वर्षानंतर सरकारने भोपाळ गॅस पीडितांच्या मदतीत वाढ केली आहे. मंत्रिगटाने सुचवलेल्या 1320 कोटींच्या पॅकेजला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. तसेच दुर्घटनास्थळाची सफाई करण्यासाठी वेगळ्या 300 कोटींच्या तरतुदीलाही मान्यता देण्यात आली. युनियन कार्बाईडचा तत्कालीन सीईओ वॉरेन अँडरसनच्या हस्तांतरणासाठी पुन्हा प्रयत्न करण्यात येणार आहेत. ट्रायल कोर्टाने दिलेल्या निकालाविरोधात नव्याने याचिका दाखल करण्यात येणार आहे.ही मदत कशी देण्यात येणार आहे ते पाहूया...मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये तर कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्यांना 5 लाख रुपये.कॅन्सर पीडितांना 2 लाख रुपये दिले जाणार आहेत. गॅस पीडितांच्या पुर्नवसनासाठी आणि आरोग्यसाठी 272 कोटी रुपये, पर्यावरण साफसफाई करण्यासाठी 310 कोटी , रासायनिक कचरा साफ करण्यासाठी 300 कोटी रुपये दिले जातीलसर्व विषारी कचरा 31 डिसेंबर 2010 पर्यंत साफ केला जाणार आहे. त्याचबरोबर अमेरिकेकडे वॉरेन अँडरसनच्या प्रत्यार्पणाची मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहेपण ही मदत केवळ दहा टक्के पीडितांनाच पुरेल, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. त्याविरोधात त्यांनी आज दिल्लीत निदर्शने केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 24, 2010 03:57 PM IST

भोपाळ गॅस पीडितांच्या पॅकेजला मान्यता

24 जून

भोपाळ गॅस दुर्घटनेप्रकरणी मंत्रिगटाने केलेल्या शिफारसी केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकारल्या आहेत. दुर्घटनेच्या तब्बल 26 वर्षानंतर सरकारने भोपाळ गॅस पीडितांच्या मदतीत वाढ केली आहे.

मंत्रिगटाने सुचवलेल्या 1320 कोटींच्या पॅकेजला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. तसेच दुर्घटनास्थळाची सफाई करण्यासाठी वेगळ्या 300 कोटींच्या तरतुदीलाही मान्यता देण्यात आली.

युनियन कार्बाईडचा तत्कालीन सीईओ वॉरेन अँडरसनच्या हस्तांतरणासाठी पुन्हा प्रयत्न करण्यात येणार आहेत. ट्रायल कोर्टाने दिलेल्या निकालाविरोधात नव्याने याचिका दाखल करण्यात येणार आहे.

ही मदत कशी देण्यात येणार आहे ते पाहूया...

मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये तर कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्यांना 5 लाख रुपये.

कॅन्सर पीडितांना 2 लाख रुपये दिले जाणार आहेत. गॅस पीडितांच्या पुर्नवसनासाठी आणि आरोग्यसाठी 272 कोटी रुपये, पर्यावरण साफसफाई करण्यासाठी 310 कोटी , रासायनिक कचरा साफ करण्यासाठी 300 कोटी रुपये दिले जातील

सर्व विषारी कचरा 31 डिसेंबर 2010 पर्यंत साफ केला जाणार आहे. त्याचबरोबर अमेरिकेकडे वॉरेन अँडरसनच्या प्रत्यार्पणाची मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे

पण ही मदत केवळ दहा टक्के पीडितांनाच पुरेल, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. त्याविरोधात त्यांनी आज दिल्लीत निदर्शने केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2010 03:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close