S M L

पेट्रोल, डिझेल, गॅस महागला

25 जूनपेट्रोल-डिझेल दरवाढीला अखेर केंद्रीय मंत्रिसमूहाने मान्यता दिली आहे. पेट्रोलचे दर 3.50 रुपयांनी, तर डिझेल 2 रुपयांनी महागले आहे. घरगुती गॅसच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. स्वयंपाकाचा गॅस 35 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ सोसावी लागणार आहे. रॉकेलच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. तब्बल 8 वर्षांनंतर रॉकेलचे दर 3 रुपयांनी वाढणार आहेत. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होईल. पेट्रोलच्या दरावरील सरकारी नियंत्रण हटवण्यात आले आहे. पण डिझेलच्या दरावरील नियंत्रणाबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिसमूहाने या दरवाढीला मान्यता दिली आहे. आधीच जनता महागाईने त्रस्त असताना आता या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. आता पाहूया राज्यातील कोणत्या शहरांमध्ये किती दरवाढ होणार आहे...मुंबईपेट्रोल - सध्याचा दर - 52.30 पैसेनवीन दर - 55.80 डिझेल - सध्याचा दर - 41.68 पैसैनवीन दर - 43.68नागपूर, शहरपेट्रोल - सध्याचा दर - 53.68 पैसे नवीन दर - 57.50 रुपयेडिझेल - सध्याचा दर - 41.61 पैसे नवीन दर - 42.61 पैसेशहराबाहेरील दर - डिझेल - 39.42 पैसे नवीन दर - 41.42 पैसेपेट्रोल सध्याचा दर - 51.05 पैसे नवीन दर - 54.55 पैसेऔरंगाबादपेट्रोल - सध्याचा दर - 51. 26 पैसेनवीन दर- 54.71 डिझेल - सध्याचा दर - 39. 61 पैसेनवीन दर - 41.61

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 25, 2010 09:27 AM IST

पेट्रोल, डिझेल, गॅस महागला

25 जून

पेट्रोल-डिझेल दरवाढीला अखेर केंद्रीय मंत्रिसमूहाने मान्यता दिली आहे.

पेट्रोलचे दर 3.50 रुपयांनी, तर डिझेल 2 रुपयांनी महागले आहे.

घरगुती गॅसच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. स्वयंपाकाचा गॅस 35 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ सोसावी लागणार आहे.

रॉकेलच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. तब्बल 8 वर्षांनंतर रॉकेलचे दर 3 रुपयांनी वाढणार आहेत. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होईल.

पेट्रोलच्या दरावरील सरकारी नियंत्रण हटवण्यात आले आहे. पण डिझेलच्या दरावरील नियंत्रणाबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही.

केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिसमूहाने या दरवाढीला मान्यता दिली आहे.

आधीच जनता महागाईने त्रस्त असताना आता या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला मोठा विरोध होण्याची शक्यता आहे.

आता पाहूया राज्यातील कोणत्या शहरांमध्ये किती दरवाढ होणार आहे...

मुंबई

पेट्रोल - सध्याचा दर - 52.30 पैसेनवीन दर - 55.80

डिझेल - सध्याचा दर - 41.68 पैसैनवीन दर - 43.68

नागपूर, शहर

पेट्रोल - सध्याचा दर - 53.68 पैसे नवीन दर - 57.50 रुपये

डिझेल - सध्याचा दर - 41.61 पैसे नवीन दर - 42.61 पैसे

शहराबाहेरील दर -

डिझेल - 39.42 पैसे नवीन दर - 41.42 पैसेपेट्रोल सध्याचा दर - 51.05 पैसे नवीन दर - 54.55 पैसे

औरंगाबाद

पेट्रोल - सध्याचा दर - 51. 26 पैसेनवीन दर- 54.71

डिझेल - सध्याचा दर - 39. 61 पैसेनवीन दर - 41.61

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 25, 2010 09:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close