S M L

नागपुरात स्कूलबस धोरणाला विरोध

25 जूननागपूरमध्ये आज ऑटो चालक संघटनेने परिवहन मंत्र्यांचा पुतळा जाळला. शालेय विद्यार्थांना ने आण करण्यार्‍या बस आणि ऑटो रिक्षा संदर्भात नवीन निकष सरकारने गुरुवारी जाहीर केले होते. ऑटो रिक्षांना लायसन्स प्रमाणेच विद्यार्थ्यांची ने-आण करावी लागेल. तसेच चालकांना आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थांना नेता येणार नाही, असे सरकारने ठरवलेल्या नवीन धोरणात म्हटले आहे. याचाच निषेध करत नागपूर जिल्हा ऑटो चालक संघटनांनी नागपूरच्या आरटीओ चौकात परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 25, 2010 09:41 AM IST

नागपुरात स्कूलबस धोरणाला विरोध

25 जून

नागपूरमध्ये आज ऑटो चालक संघटनेने परिवहन मंत्र्यांचा पुतळा जाळला. शालेय विद्यार्थांना ने आण करण्यार्‍या बस आणि ऑटो रिक्षा संदर्भात नवीन निकष सरकारने गुरुवारी जाहीर केले होते.

ऑटो रिक्षांना लायसन्स प्रमाणेच विद्यार्थ्यांची ने-आण करावी लागेल. तसेच चालकांना आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थांना नेता येणार नाही, असे सरकारने ठरवलेल्या नवीन धोरणात म्हटले आहे.

याचाच निषेध करत नागपूर जिल्हा ऑटो चालक संघटनांनी नागपूरच्या आरटीओ चौकात परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 25, 2010 09:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close