S M L

बेस्ट फाईव्हसाठी राज ठाकरे गेले वर्षा बंगल्यावर

26 जूनबेस्ट फाईव्हवच्या संदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली.शिक्षण हा राज्याचा विषय आहे. त्यामुळे सर्व सूत्रे महाराष्ट्र सरकार आणि एसएससी बोर्डाकडे असली पाहिजेत, असे म्हणत राज्य सरकारच्या सुप्रीम कोर्टात जाण्याच्या निर्णयाला मनसेने पाठिंबा दर्शवला आहे. राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात अकरावी प्रवेशाचा घोळ लवकर मिटवण्याचे आवाहन केले. तसेच आयसीएसई आणि सीबीएसईच्या शाळांना जादा एफएसआय देऊन त्याच इमारतीत 11 वी 12 वी चे वर्ग वाढवण्याचे बंधन घालावे, अशी सूचना राज यांनी केली. याशिवाय खासगी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी कायदा करण्याचेही आवाहन त्यांनी केले. तसेच खासगी शाळांमधील वाढीव फीवर नियंत्रण आणण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची सूचनाही केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2010 01:04 PM IST

बेस्ट फाईव्हसाठी राज ठाकरे गेले वर्षा बंगल्यावर

26 जून

बेस्ट फाईव्हवच्या संदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली.

शिक्षण हा राज्याचा विषय आहे. त्यामुळे सर्व सूत्रे महाराष्ट्र सरकार आणि एसएससी बोर्डाकडे असली पाहिजेत, असे म्हणत राज्य सरकारच्या सुप्रीम कोर्टात जाण्याच्या निर्णयाला मनसेने पाठिंबा दर्शवला आहे.

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात अकरावी प्रवेशाचा घोळ लवकर मिटवण्याचे आवाहन केले. तसेच आयसीएसई आणि सीबीएसईच्या शाळांना जादा एफएसआय देऊन त्याच इमारतीत 11 वी 12 वी चे वर्ग वाढवण्याचे बंधन घालावे, अशी सूचना राज यांनी केली.

याशिवाय खासगी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी कायदा करण्याचेही आवाहन त्यांनी केले. तसेच खासगी शाळांमधील वाढीव फीवर नियंत्रण आणण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची सूचनाही केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2010 01:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close