S M L

दानवे पुन्हा अध्यक्षपदी, औरंगाबादेत भाजपला चपराक

26 जूनभारतीय जनता पक्षाने शिवसेनेचे औरंगाबादचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेने पुन्हा एकदा दानवे यांचीच जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करून भाजपला चपराक दिली आहे. अंबादास दानवे यांच्यासह त्र्यंबक तुपे यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये शिवसेना- भाजपमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्या घरावरील झालेल्या हल्ल्यानंतर भाजपने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र शिवसेनेने पुन्हा एकदा त्यांना जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त करून भाजपला चपराक दिली आहे. यापूर्वी अंबादास दानवे आणि यांच्यासह सुहास दाशरथे हे प्रभारी जिल्हाप्रमुख होते. आता दानवे आणि त्र्यंबक तुपे यांना ही जबाबदारी दिली आहे. दानवे यांच्याकडे गंगापूर, वैजापूर, औरंगाबाद पूर्व, पश्चिम आणि मध्य या अत्यंत महत्वाच्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बागडे यांच्या घरावरील हल्ल्यापासून अंबादास दानवे हे फरार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2010 02:25 PM IST

दानवे पुन्हा अध्यक्षपदी, औरंगाबादेत भाजपला चपराक

26 जून

भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचे औरंगाबादचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेने पुन्हा एकदा दानवे यांचीच जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करून भाजपला चपराक दिली आहे.

अंबादास दानवे यांच्यासह त्र्यंबक तुपे यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये शिवसेना- भाजपमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्या घरावरील झालेल्या हल्ल्यानंतर भाजपने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र शिवसेनेने पुन्हा एकदा त्यांना जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त करून भाजपला चपराक दिली आहे.

यापूर्वी अंबादास दानवे आणि यांच्यासह सुहास दाशरथे हे प्रभारी जिल्हाप्रमुख होते. आता दानवे आणि त्र्यंबक तुपे यांना ही जबाबदारी दिली आहे.

दानवे यांच्याकडे गंगापूर, वैजापूर, औरंगाबाद पूर्व, पश्चिम आणि मध्य या अत्यंत महत्वाच्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बागडे यांच्या घरावरील हल्ल्यापासून अंबादास दानवे हे फरार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2010 02:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close