S M L

गोरेगाव पश्चिममध्ये पोटनिवडणूक

26 जूनगोरेगाव पश्चिममधील वॉर्ड नंबर 50 मध्ये उद्या पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसचे आर. पिल्लई यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. शिवसेना आणि काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेनेचे राजू पाध्ये यांनी या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला आहे. पण राजू पाध्ये यांना टक्कर देण्यासाठी आर. पिल्लई यांची मुलगी श्रीकला निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. शिवसेना-भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने श्रीकला यांच्या बाजूने ताकद लावली आहे. सध्या सत्तेत असलेल्या शिवसेना भाजपकडे नगरसेवक आहेत, 115 तर विरोधी बाकांवर असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीकडे नगरसेवक आहेत, 107. दोघांमध्ये अंतर आहे फक्त 8 नगरसेवकांचे. त्यामुळेच ही निवडणूक दोघांसाठी प्रतिष्ठेची आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 26, 2010 03:08 PM IST

गोरेगाव पश्चिममध्ये पोटनिवडणूक

26 जून

गोरेगाव पश्चिममधील वॉर्ड नंबर 50 मध्ये उद्या पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसचे आर. पिल्लई यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे.

शिवसेना आणि काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेनेचे राजू पाध्ये यांनी या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला आहे. पण राजू पाध्ये यांना टक्कर देण्यासाठी आर. पिल्लई यांची मुलगी श्रीकला निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

शिवसेना-भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने श्रीकला यांच्या बाजूने ताकद लावली आहे.

सध्या सत्तेत असलेल्या शिवसेना भाजपकडे नगरसेवक आहेत, 115 तर विरोधी बाकांवर असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीकडे नगरसेवक आहेत, 107. दोघांमध्ये अंतर आहे फक्त 8 नगरसेवकांचे. त्यामुळेच ही निवडणूक दोघांसाठी प्रतिष्ठेची आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2010 03:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close