S M L

मुंबईतून होताहेत मुली गायब

सुधाकर कांबळे, मुंबई29 जूनमुंबईत कुर्ला इथे अल्पवयीन मुलींवर घडलेल्या अत्याचारांच्या घटनांमुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत. ऑस्करविजेत्या स्लमडॉग मिलेनिअर या सिनेमात सुद्धा मुंबईतील लहान मुलांच्या विक्री व्यवहारावर भाष्य करण्यात आले आहे. पण मुलींना भिकेला, गैरधंद्याला लावणे ही लाजीरवाणी वस्तूस्थिती आता आकडेवारींतूनही समोर आली आहे.मुंबईत 2010 या वर्षात 291 मुली हरवल्याच्या तक्रारी होत्या. त्यापैकी 216 मुली सापडल्यात. मात्र अद्याप 75 मुलींचा शोध लागलेलाच नाही.तर 2002 ते 2009 या आठ वर्षात मुंबईतून 13, 372 अल्पवयीन मुली हरवल्या होत्या. त्यापैकी 12, 077 मुली सापडल्या. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे एक हजार 491 मुली आजही गायब आहेत.या वर्षात गायब झालेल्या 75 मुलींबाबत आणि गेल्या काही वर्षांत गायब झालेल्या सुमारे चौदाशेहून अधिक मुलींचे काय झाले? त्या कुठे गेल्यात याबाबत कुणाला काहीच माहिती नाही. गेल्या अनेक वर्षात त्यांच्याबाबत काही उलगडाही झालेला नाही. पोलिसांत नोंदवल्या गेलेल्या तक्रारींची ही आकडेवारी आहे. पण अनेक मुली हरवूनही त्यांची नोंद पोलीस रेकॉर्डपर्यंत पोहोचत नाही. मुंबईतून मुली गायब होण्याचे प्रकार काही थांबत नाहीत. आणि गायब होणार्‍या, हरवणार्‍या मुलींचा शोध लावण्यात मुंबई पोलीस सपशेल अपयशीच ठरलेले दिसत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 29, 2010 01:27 PM IST

मुंबईतून होताहेत मुली गायब

सुधाकर कांबळे, मुंबई

29 जून

मुंबईत कुर्ला इथे अल्पवयीन मुलींवर घडलेल्या अत्याचारांच्या घटनांमुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत. ऑस्करविजेत्या स्लमडॉग मिलेनिअर या सिनेमात सुद्धा मुंबईतील लहान मुलांच्या विक्री व्यवहारावर भाष्य करण्यात आले आहे.

पण मुलींना भिकेला, गैरधंद्याला लावणे ही लाजीरवाणी वस्तूस्थिती आता आकडेवारींतूनही समोर आली आहे.मुंबईत 2010 या वर्षात 291 मुली हरवल्याच्या तक्रारी होत्या. त्यापैकी 216 मुली सापडल्यात. मात्र अद्याप 75 मुलींचा शोध लागलेलाच नाही.

तर 2002 ते 2009 या आठ वर्षात मुंबईतून 13, 372 अल्पवयीन मुली हरवल्या होत्या. त्यापैकी 12, 077 मुली सापडल्या. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे एक हजार 491 मुली आजही गायब आहेत.

या वर्षात गायब झालेल्या 75 मुलींबाबत आणि गेल्या काही वर्षांत गायब झालेल्या सुमारे चौदाशेहून अधिक मुलींचे काय झाले? त्या कुठे गेल्यात याबाबत कुणाला काहीच माहिती नाही. गेल्या अनेक वर्षात त्यांच्याबाबत काही उलगडाही झालेला नाही.

पोलिसांत नोंदवल्या गेलेल्या तक्रारींची ही आकडेवारी आहे. पण अनेक मुली हरवूनही त्यांची नोंद पोलीस रेकॉर्डपर्यंत पोहोचत नाही.

मुंबईतून मुली गायब होण्याचे प्रकार काही थांबत नाहीत. आणि गायब होणार्‍या, हरवणार्‍या मुलींचा शोध लावण्यात मुंबई पोलीस सपशेल अपयशीच ठरलेले दिसत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2010 01:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close