S M L

'कोकण रेल्वेसाठी काँग्रेसकडून आंदोलन नाही'

30 जूनकोकण रेल्वेबाबत काँग्रेस कुठलेही आंदोलन करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आंदोलनाची घोषणा करणार्‍या नारायण राणेंना, एकटे पाडण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. राणेंच्या आंदोलनापासून मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला बाजूला सारले आहे. त्यामुळे आता नारायण राणे आपल्या आंदोलनाबाबत काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांनी दुसर्‍यांदा राणेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. याअगोदर शिक्षणसेवक भरतीवरून मुख्यमंत्र्यांनी राणेंची कोंडी केली होती. आणि त्यानंतर आता कोकण रेल्वेवरूनही दोघांमध्ये शितयुद्ध सुरू झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 30, 2010 11:14 AM IST

'कोकण रेल्वेसाठी काँग्रेसकडून आंदोलन नाही'

30 जून

कोकण रेल्वेबाबत काँग्रेस कुठलेही आंदोलन करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे आंदोलनाची घोषणा करणार्‍या नारायण राणेंना, एकटे पाडण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

राणेंच्या आंदोलनापासून मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला बाजूला सारले आहे. त्यामुळे आता नारायण राणे आपल्या आंदोलनाबाबत काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांनी दुसर्‍यांदा राणेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

याअगोदर शिक्षणसेवक भरतीवरून मुख्यमंत्र्यांनी राणेंची कोंडी केली होती. आणि त्यानंतर आता कोकण रेल्वेवरूनही दोघांमध्ये शितयुद्ध सुरू झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 30, 2010 11:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close