S M L

बिहारमध्ये रेल्वे अडवल्या

5 जुलैबिहारमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत बंदचे आवाहन केले. रेल्वे ट्रॅकवर आणि रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांनी गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम रेल्वे सेवेवर झाला. लांब पल्ल्याच्या गाड्या त्यामुळे खोळंबल्या.दिल्लीत ट्रॅफिक जामराजधानी दिल्लीत भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनांमुळे ठिकठिकाणी ट्रॅफिक जॅम झाला. करोल बाग या ठिकाणी निदर्शकांनी मेट्रो रेल्वे बंद पाडली. अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. लखनौत लाठीमारभाजप नेते अरूण जेटली यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे तिथे कार्यकर्ते आणि पोलिसांत चकमक झडली. हा मोर्चा विधानसभेच्या दिशेने निघाला होता. पाटण्यात बस फोडल्यापाटण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी रिक्षा आणि बसेसची तोडफोड केली. तसेच भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी अनेक ट्रेन्स थांबवल्या. मुंबईकडे येणारी कुर्ला एक्सप्रेससुद्धा अडवण्यात आली. कोलकाता ठप्पडाव्यांचे राज्य असलेल्या कोलकात्याला बंदचा जोरदार फटका बसला. टॅक्सी, बसेस, रेल्वे, विमानसेवा पूर्णपणे ठप्प आहेत. फक्त मेट्रो रेल्वे सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2010 08:41 AM IST

बिहारमध्ये रेल्वे अडवल्या

5 जुलै

बिहारमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत बंदचे आवाहन केले. रेल्वे ट्रॅकवर आणि रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांनी गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम रेल्वे सेवेवर झाला. लांब पल्ल्याच्या गाड्या त्यामुळे खोळंबल्या.

दिल्लीत ट्रॅफिक जाम

राजधानी दिल्लीत भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनांमुळे ठिकठिकाणी ट्रॅफिक जॅम झाला. करोल बाग या ठिकाणी निदर्शकांनी मेट्रो रेल्वे बंद पाडली. अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

लखनौत लाठीमार

भाजप नेते अरूण जेटली यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे तिथे कार्यकर्ते आणि पोलिसांत चकमक झडली. हा मोर्चा विधानसभेच्या दिशेने निघाला होता.

पाटण्यात बस फोडल्या

पाटण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी रिक्षा आणि बसेसची तोडफोड केली. तसेच भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी अनेक ट्रेन्स थांबवल्या. मुंबईकडे येणारी कुर्ला एक्सप्रेससुद्धा अडवण्यात आली.

कोलकाता ठप्प

डाव्यांचे राज्य असलेल्या कोलकात्याला बंदचा जोरदार फटका बसला. टॅक्सी, बसेस, रेल्वे, विमानसेवा पूर्णपणे ठप्प आहेत. फक्त मेट्रो रेल्वे सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2010 08:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close