S M L

इशरत निर्दोष असल्याचा पालकांचा दावा

6 जुलैसहा वर्षांपूर्वी गुजरात पोलिसांनी गांधीनगर भागात इशरत जहाँ या तरूणीचे तिच्या तीन साथीदारांसह एन्काऊंटर केले होते. इशरत प्रकरणी कोर्टाने नंतर गुजरात पोलीस आणि गुजरात सरकारविरोधात कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. मात्र हीच इशरत लष्कर-ए-तोयबाची सक्रिय अतिरेकी असल्याचे मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हीड हेडली याने म्हटले आहे.त्यामुळे इशरतच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. या प्रकरणी इशरतच्या कुटुंबियांनी आपली बाजू मांडली आहे. इशरतची आई समीमा जहाँ आणि इशरत प्रकरणी कोर्टाची पायरी चढणारे तिचे काका रौफ लाला यांनी म्हटले आहे, की त्यांची मुलगी पूर्णपणे निर्दोष आहे. गुजरात पोलिसांनी खोट्या चकमकीत तिला मारले. इशरत प्रकरणी ज्या प्रकारे कोर्टाचा निर्णय वारंवार आपल्या बाजूने लागत आहे. त्यामुळे घाबरलेले पोलीस आणि नरेंद्र मोदींनी हेडलीचे नाव या प्रकरणात आणून आपल्याला घाबरवायला सुरूवात केली आहे. मात्र अशा प्रकारांना आपण घाबरत नसल्याचे समीमा यांचे म्हणणे आहे. त्यांचे लक्ष आता कोर्टाच्या निर्णयाकडे लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 6, 2010 03:25 PM IST

इशरत निर्दोष असल्याचा पालकांचा दावा

6 जुलै

सहा वर्षांपूर्वी गुजरात पोलिसांनी गांधीनगर भागात इशरत जहाँ या तरूणीचे तिच्या तीन साथीदारांसह एन्काऊंटर केले होते.

इशरत प्रकरणी कोर्टाने नंतर गुजरात पोलीस आणि गुजरात सरकारविरोधात कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. मात्र हीच इशरत लष्कर-ए-तोयबाची सक्रिय अतिरेकी असल्याचे मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हीड हेडली याने म्हटले आहे.त्यामुळे इशरतच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

या प्रकरणी इशरतच्या कुटुंबियांनी आपली बाजू मांडली आहे. इशरतची आई समीमा जहाँ आणि इशरत प्रकरणी कोर्टाची पायरी चढणारे तिचे काका रौफ लाला यांनी म्हटले आहे, की त्यांची मुलगी पूर्णपणे निर्दोष आहे.

गुजरात पोलिसांनी खोट्या चकमकीत तिला मारले. इशरत प्रकरणी ज्या प्रकारे कोर्टाचा निर्णय वारंवार आपल्या बाजूने लागत आहे. त्यामुळे घाबरलेले पोलीस आणि नरेंद्र मोदींनी हेडलीचे नाव या प्रकरणात आणून आपल्याला घाबरवायला सुरूवात केली आहे.

मात्र अशा प्रकारांना आपण घाबरत नसल्याचे समीमा यांचे म्हणणे आहे. त्यांचे लक्ष आता कोर्टाच्या निर्णयाकडे लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 6, 2010 03:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close