S M L

महाराष्ट्र एकीकरणाला धक्का

7 जुलैगेली पाच दशके सुरू असणार्‍या महाराष्ट्राच्या एकीकरणाच्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. केंद्र सरकारने कर्नाटकची बाजू उचलून धरली आहे. सीमावादाच्या प्रश्नावरून 2004मध्ये महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात गेले. त्यावर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला त्यांची भूमिका विचारली. त्यावर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, केंद्र सरकारने कर्नाटकची बाजू उचलून धरली. बेळगाव, गुलबर्गा, निपाणीसह सीमाभागातील 814 गावे कर्नाटकातच राहावी असे, केंद्राने म्हटले आहे. या भागात मराठी भाषकांची संख्या जास्त आहे. पण भाषा हा एकमेव निकष होऊ शकत नाही. संस्कृती आणि अन्य घटकांचाही विचार करावा लागतो, असे केंद्राने म्हटले आहे.तसेच महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात केस दाखल केल्याबद्धल त्यांना दंड ठोठावण्यात यावा, अशी कठोर भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आता 12 जुलैला सुनावणी होणार आहे.एन.डीं.ची केंद्रावर टीकाकेंद्र सरकारच्या या भूमिकेबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील यांनी केंद्रावर जोरदार टीका केली आहे. बाळासाहेब संतापलेशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केंद्राच्या या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. भाषा हा निकष मान्य नसेल, तर मग सर्व राज्ये बरखास्त करा अशी संतप्त प्रतिक्रीया बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेने कायम महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा दिला आहे. तसेच वेळोवेळी आंदोलनही केले आहे.कन्नड वेदिकेचा जल्लोषबेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. कन्नड वेदिकेच्या 25 कार्यकर्त्यांनी बेळगावच्या चित्तुर चेन्नमा चौकात विजय साजरा केला. आतषबाजी केली. कर्नाटकच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रामुख्याने हुबळी, बंगऴुरू या भागात कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी भर चौकात हा जल्लोष साजरा केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 7, 2010 09:19 AM IST

महाराष्ट्र एकीकरणाला धक्का

7 जुलै

गेली पाच दशके सुरू असणार्‍या महाराष्ट्राच्या एकीकरणाच्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. केंद्र सरकारने कर्नाटकची बाजू उचलून धरली आहे.

सीमावादाच्या प्रश्नावरून 2004मध्ये महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात गेले. त्यावर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला त्यांची भूमिका विचारली. त्यावर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, केंद्र सरकारने कर्नाटकची बाजू उचलून धरली.

बेळगाव, गुलबर्गा, निपाणीसह सीमाभागातील 814 गावे कर्नाटकातच राहावी असे, केंद्राने म्हटले आहे.

या भागात मराठी भाषकांची संख्या जास्त आहे. पण भाषा हा एकमेव निकष होऊ शकत नाही. संस्कृती आणि अन्य घटकांचाही विचार करावा लागतो, असे केंद्राने म्हटले आहे.

तसेच महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात केस दाखल केल्याबद्धल त्यांना दंड ठोठावण्यात यावा, अशी कठोर भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे.

या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आता 12 जुलैला सुनावणी होणार आहे.

एन.डीं.ची केंद्रावर टीका

केंद्र सरकारच्या या भूमिकेबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील यांनी केंद्रावर जोरदार टीका केली आहे.

बाळासाहेब संतापले

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केंद्राच्या या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. भाषा हा निकष मान्य नसेल, तर मग सर्व राज्ये बरखास्त करा अशी संतप्त प्रतिक्रीया बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेने कायम महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा दिला आहे. तसेच वेळोवेळी आंदोलनही केले आहे.

कन्नड वेदिकेचा जल्लोष

बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. कन्नड वेदिकेच्या 25 कार्यकर्त्यांनी बेळगावच्या चित्तुर चेन्नमा चौकात विजय साजरा केला. आतषबाजी केली.

कर्नाटकच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रामुख्याने हुबळी, बंगऴुरू या भागात कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी भर चौकात हा जल्लोष साजरा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 7, 2010 09:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close