S M L

मुख्यमंत्री आणि राणेंमध्ये जुंपणार

7 जुलैकोकण रेल्वेच्या मुद्यावर आता मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि नारायण राणे यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे. 9 जुलैला नारायण राणेंनी पुकारलेले आंदोलन हे काँग्रेसचे आंदोलन नाही, असे मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. पण आता हे आंदोलन झाले, तर काँग्रेसच्या बॅनरखालीच होणार असे नारायण राणेंनी म्हटले आहे. उद्यापर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही, तर 9 जुलैला आंदोलन करणार, असेही राणेंनी म्हटले आहे. सावंतवाडीतून गाडी सुरू करा, सावंतवाडी टर्मिनस करा, तसेच काही ठिकाणी उड्डाणपुलांच्या मागणीसह इतर मागण्या राणेंनी केल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 7, 2010 05:58 PM IST

मुख्यमंत्री आणि राणेंमध्ये जुंपणार

7 जुलै

कोकण रेल्वेच्या मुद्यावर आता मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि नारायण राणे यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे.

9 जुलैला नारायण राणेंनी पुकारलेले आंदोलन हे काँग्रेसचे आंदोलन नाही, असे मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

पण आता हे आंदोलन झाले, तर काँग्रेसच्या बॅनरखालीच होणार असे नारायण राणेंनी म्हटले आहे.

उद्यापर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही, तर 9 जुलैला आंदोलन करणार, असेही राणेंनी म्हटले आहे.

सावंतवाडीतून गाडी सुरू करा, सावंतवाडी टर्मिनस करा, तसेच काही ठिकाणी उड्डाणपुलांच्या मागणीसह इतर मागण्या राणेंनी केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 7, 2010 05:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close