S M L

केंद्राचे प्रतिज्ञापत्र फेटाळले

12 जुलैसीमाप्रश्ना प्रकरणी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राचा दुरुस्ती अर्ज स्वीकारला गेला आहे. त्याचसोबत केंद्र सरकारने सादर केलेले प्रतिज्ञापत्रही सुप्रीम कोर्टाने फेटाळले आहे. राज्य सरकार आता चार आठवड्यांच्या आत सुधारीत याचिका सादर करणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे कर्नाटक आणि केंद्र सरकारला झटका बसला आहे.केंद्र आणि कर्नाटक सरकारने या दुरुस्ती अर्जाला विरोध केला होता. मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रासोबतच सीमावासीयंना मोठा दिलासा मिळाला आहे. बेळगाव , कारवार, बिदर, परिसरातली 814 गावे महाराष्ट्रात सामील व्हावीत, अशी याचिका महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. या मूळ याचिकेत महाराष्ट्राने गेल्या वर्षी दुरुस्ती अर्ज सादर केला. पंजाब, हरियाणा तसेच आंध्र, तामिळनाडू आणि इतर राज्यामधील सीमावाद ज्या पध्दतीने सोडवण्यात आले, त्याच सूत्रानुसार बेळगाव आणि परिसर महाराष्ट्रात सामील करावा, असे या दुरुस्ती अर्जात म्हटले आहे. या केसमध्ये प्रतिवादी असलेल्या कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकारने या दुरुस्ती अर्जाबद्दलची आपली प्रतिज्ञापत्रे सादर केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 12, 2010 06:30 AM IST

केंद्राचे प्रतिज्ञापत्र फेटाळले

12 जुलै

सीमाप्रश्ना प्रकरणी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राचा दुरुस्ती अर्ज स्वीकारला गेला आहे. त्याचसोबत केंद्र सरकारने सादर केलेले प्रतिज्ञापत्रही सुप्रीम कोर्टाने फेटाळले आहे.

राज्य सरकार आता चार आठवड्यांच्या आत सुधारीत याचिका सादर करणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे कर्नाटक आणि केंद्र सरकारला झटका बसला आहे.

केंद्र आणि कर्नाटक सरकारने या दुरुस्ती अर्जाला विरोध केला होता. मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रासोबतच सीमावासीयंना मोठा दिलासा मिळाला आहे.

बेळगाव , कारवार, बिदर, परिसरातली 814 गावे महाराष्ट्रात सामील व्हावीत, अशी याचिका महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. या मूळ याचिकेत महाराष्ट्राने गेल्या वर्षी दुरुस्ती अर्ज सादर केला.

पंजाब, हरियाणा तसेच आंध्र, तामिळनाडू आणि इतर राज्यामधील सीमावाद ज्या पध्दतीने सोडवण्यात आले, त्याच सूत्रानुसार बेळगाव आणि परिसर महाराष्ट्रात सामील करावा, असे या दुरुस्ती अर्जात म्हटले आहे.

या केसमध्ये प्रतिवादी असलेल्या कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकारने या दुरुस्ती अर्जाबद्दलची आपली प्रतिज्ञापत्रे सादर केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2010 06:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close