S M L

बेळगावसाठी पंतप्रधानांची भेट

14 जुलैबेळगावच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची दिल्लीत भेट घेतली.केंद्राने बेळगावबाबत तटस्थ भूमिका घ्यावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. बेळगावामध्ये मराठी माणसावर होत असलेल्या अत्याचारात लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले. पण बेळगाव केंद्रशासित करण्याची मागणी मात्र आता बाजूला पडली आहे. विधानसभेत जो सर्वपक्षीय ठराव झाला होता, त्याच्याच आधारे पंतप्रधानांकडे महाराष्ट्राची बाजू मांडली गेली. पंतप्रधानांनी ठरावाची प्रत गृहमंत्र्यांकडे पाठवण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 14, 2010 04:18 PM IST

बेळगावसाठी पंतप्रधानांची भेट

14 जुलै

बेळगावच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची दिल्लीत भेट घेतली.

केंद्राने बेळगावबाबत तटस्थ भूमिका घ्यावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. बेळगावामध्ये मराठी माणसावर होत असलेल्या अत्याचारात लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले. पण बेळगाव केंद्रशासित करण्याची मागणी मात्र आता बाजूला पडली आहे.

विधानसभेत जो सर्वपक्षीय ठराव झाला होता, त्याच्याच आधारे पंतप्रधानांकडे महाराष्ट्राची बाजू मांडली गेली. पंतप्रधानांनी ठरावाची प्रत गृहमंत्र्यांकडे पाठवण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 14, 2010 04:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close