S M L

चंद्राबाबूंची रवानगी औरंगाबादला

20 जुलैबाभळी बंधार्‍याच्या प्रश्नावरून गेले काही दिवस पोलीस आणि प्रशासनाला वेठीला धरणार्‍या चंद्राबाबू नायडूंची अखेर औरंगाबादला रवानगी करण्यात आली आहे. धर्माबादच्या आयटीआयमधून चंद्राबाबू आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी बळाचा वापर करत बाहेर काढले. नांदेड शहरात प्रवेश करताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चंद्राबाबू नायडूंची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान चंद्राबाबू नायडू यांच्या समर्थकांनी कलेक्टर आणि एसपीशी हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ केली होती, असेही समजते. औरंगाबादमध्ये मनसे आणि शिवसेनेच्या वतीने चंद्राबाबूंच्या विरोधात निर्दशने केली जात आहेत. कडेकोट बंदोबस्त दरम्यान औरंगाबाद येथील हर्सुल जेलच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 10 पीआय, 25 पीएसआय आणि 150 पोलीस कर्मचारी जेलच्या परिसरात तर हर्सुलपासून औरंगाबादकडे येणार्‍या ठराविक अंतरावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.शिवाय चंद्राबाबूंसाठी कोणतीही खास व्यवस्था नसेल. त्यांना इतर कैद्यांप्रमाणेच ठेवण्यात येणार येईल. त्यांच्यासाठी दोन बॅरेक्स तयार केले आहेत, अशी माहिती हर्सुलचे जेल सुपरिटेंडंट भारत भोसले यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 20, 2010 11:09 AM IST

चंद्राबाबूंची रवानगी औरंगाबादला

20 जुलै

बाभळी बंधार्‍याच्या प्रश्नावरून गेले काही दिवस पोलीस आणि प्रशासनाला वेठीला धरणार्‍या चंद्राबाबू नायडूंची अखेर औरंगाबादला रवानगी करण्यात आली आहे. धर्माबादच्या आयटीआयमधून चंद्राबाबू आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी बळाचा वापर करत बाहेर काढले.

नांदेड शहरात प्रवेश करताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चंद्राबाबू नायडूंची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान चंद्राबाबू नायडू यांच्या समर्थकांनी कलेक्टर आणि एसपीशी हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ केली होती, असेही समजते. औरंगाबादमध्ये मनसे आणि शिवसेनेच्या वतीने चंद्राबाबूंच्या विरोधात निर्दशने केली जात आहेत.

कडेकोट बंदोबस्त

दरम्यान औरंगाबाद येथील हर्सुल जेलच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 10 पीआय, 25 पीएसआय आणि 150 पोलीस कर्मचारी जेलच्या परिसरात तर हर्सुलपासून औरंगाबादकडे येणार्‍या ठराविक अंतरावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

शिवाय चंद्राबाबूंसाठी कोणतीही खास व्यवस्था नसेल. त्यांना इतर कैद्यांप्रमाणेच ठेवण्यात येणार येईल. त्यांच्यासाठी दोन बॅरेक्स तयार केले आहेत, अशी माहिती हर्सुलचे जेल सुपरिटेंडंट भारत भोसले यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2010 11:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close