S M L

राज्यभरात संततधार

22 जुलैराज्यभरात पावसाची संततधार सुरू आहे. कोकणात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पाऊस पडत आहे. ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई आणि नालासोपार्‍यात पाणी साचले आहे.रत्नागिरीत मुसळधाररत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. खेड शहरात जगबुडी नदीचे पाणी शिरले आहे. खेड बाजारपेठेत पाणी शिरले आहे. खेडच्या मशीद चौकात पाणी घुसले आहे. तसेच तेथील 200 ते 250 दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. खेडच्या मच्छिमार्केटचा संपर्क तुटला आहे.खेड दापोली आणि मंडणगड मार्गावर नारंगी नदीचे पाणी साचल्याने तेथील वाहतूकही ठप्प झाली आहे. खेडच्या साकवली इथे चोरद नदीच्या पुलावरुन पाणी जात असल्याने 40 गावाचा संपर्क तुटला आहे. चिपळूणजवळच्या खेर्डी पुलावर पाणी साचल्याने चिपळूण-कराड हायवे बंद झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 22, 2010 09:18 AM IST

राज्यभरात संततधार

22 जुलै

राज्यभरात पावसाची संततधार सुरू आहे. कोकणात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पाऊस पडत आहे. ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई आणि नालासोपार्‍यात पाणी साचले आहे.

रत्नागिरीत मुसळधार

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. खेड शहरात जगबुडी नदीचे पाणी शिरले आहे. खेड बाजारपेठेत पाणी शिरले आहे.

खेडच्या मशीद चौकात पाणी घुसले आहे. तसेच तेथील 200 ते 250 दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. खेडच्या मच्छिमार्केटचा संपर्क तुटला आहे.

खेड दापोली आणि मंडणगड मार्गावर नारंगी नदीचे पाणी साचल्याने तेथील वाहतूकही ठप्प झाली आहे. खेडच्या साकवली इथे चोरद नदीच्या पुलावरुन पाणी जात असल्याने 40 गावाचा संपर्क तुटला आहे.

चिपळूणजवळच्या खेर्डी पुलावर पाणी साचल्याने चिपळूण-कराड हायवे बंद झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2010 09:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close