S M L

दत्तक वस्ती योजनेचा लाभ नगरसेवकांनाच

22 जुलैगोविंद तुपे, मुंबईमुंबईतील सर्व झोपडपट्यांतील साफ सफाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने दत्तक वस्ती योजना आणली. पण या योजनेचा लाभ लोकांना कमी आणि नगरसेवकांना जास्त मिळताना दिसत आहे. कारण नगरसेवकांनी आपल्याच मालकीच्या संस्थांच्या नावावर या दत्तक वस्तीची टेंडर घेतली आहेत. आणि तीही बोगस कागदपत्रे सादर करून. मुंबई महानगर पालिकेच्या या दत्तक वस्ती योजनेची टेंडर्स नगरसेवकांच्याच संस्थांना मिळत आहेत. अनेक बोगस कागदपत्रे सादर करून या संस्था टेंडर्स गिळत आहेत. माहितीच्या अधिकाराखाली हा सगळा प्रकार, घाटकोपरच्या सचिन गायकवाड यांनी उघडकीस आणला आहे. वार्ड क्र. 128 चे मनसे नगरसेवक परमेश्वर कदम यांनीही बोगस कागदपत्रे सादर करून, आपल्या जनजागृती सामाजिक संस्थेला हे दत्तक वस्तीचे टेंडर दिल्याचा आरोप केला आहे.तर हे आरोप खोटे असल्याचे परमेश्वर कदम म्हणत आहेत. धर्मादाय आयुक्तांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परमेश्वर कदम हेच जनजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष असल्याचे स्पष्ट होत आहे.एवढे सगळे झाल्यावर आता कारवाई करू, असे महापौर म्हणत आहेत.महापौरांनी आश्वासन तर दिले. आता बोगसगिरी करून मुंबई मनपालाच लुटून खाणार्‍या नगरसेवकांची आणि अधिकार्‍यांची कशी साफसफाई होणार, ते पहावे लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 22, 2010 12:56 PM IST

दत्तक वस्ती योजनेचा लाभ नगरसेवकांनाच

22 जुलै

गोविंद तुपे, मुंबई

मुंबईतील सर्व झोपडपट्यांतील साफ सफाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने दत्तक वस्ती योजना आणली. पण या योजनेचा लाभ लोकांना कमी आणि नगरसेवकांना जास्त मिळताना दिसत आहे. कारण नगरसेवकांनी आपल्याच मालकीच्या संस्थांच्या नावावर या दत्तक वस्तीची टेंडर घेतली आहेत. आणि तीही बोगस कागदपत्रे सादर करून.

मुंबई महानगर पालिकेच्या या दत्तक वस्ती योजनेची टेंडर्स नगरसेवकांच्याच संस्थांना मिळत आहेत. अनेक बोगस कागदपत्रे सादर करून या संस्था टेंडर्स गिळत आहेत. माहितीच्या अधिकाराखाली हा सगळा प्रकार, घाटकोपरच्या सचिन गायकवाड यांनी उघडकीस आणला आहे. वार्ड क्र. 128 चे मनसे नगरसेवक परमेश्वर कदम यांनीही बोगस कागदपत्रे सादर करून, आपल्या जनजागृती सामाजिक संस्थेला हे दत्तक वस्तीचे टेंडर दिल्याचा आरोप केला आहे.तर हे आरोप खोटे असल्याचे परमेश्वर कदम म्हणत आहेत.

धर्मादाय आयुक्तांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परमेश्वर कदम हेच जनजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष असल्याचे स्पष्ट होत आहे.एवढे सगळे झाल्यावर आता कारवाई करू, असे महापौर म्हणत आहेत.

महापौरांनी आश्वासन तर दिले. आता बोगसगिरी करून मुंबई मनपालाच लुटून खाणार्‍या नगरसेवकांची आणि अधिकार्‍यांची कशी साफसफाई होणार, ते पहावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2010 12:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close