S M L

गॉल टेस्ट श्रीलंकेच्या खिशात

22 जुलैश्रीलंकन टीमने अखेर गॉल टेस्ट दहा विकेट राखून जिंकली आहे. भारताने समोर ठेवलेले 95 रन्सचे आव्हान त्यांनी पंधराव्या ओव्हरमध्येच पार केले. या टेस्ट विजयासह लंकन टीमसाठी आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे मुथय्या मुरलीधरनने आपल्या शेवटच्या टेस्टमध्ये 800 टेस्ट विकेट्स पूर्ण केल्या. आज दुपारी प्रग्यान ओझाची घेतलेली विकेट त्याची 800वी रेकॉर्ड विकेट ठरली. टेस्टमध्ये 800 विकेट घेणारा तो पहिला बॉलर ठरला आहे. भारताच्या दुसर्‍या इनिंगमध्ये त्याने एकूण तीन विकेट घेतल्या. भारताची दुसरी इनिंग आज 338 रन्समध्ये आटोपली. आज लक्ष्मणने 69 रन्स केले. आणि ईशांत शर्मा, प्रग्यान ओझा या शेवटच्या जोडीने दोन तास किल्ला लढवत हाफ सेंच्युरी पार्टनरशिप केली. त्यामुळे भारताने लंकेसमोर विजयासाठी 95 रन्स करण्याचं आव्हान ठेवले. पण दिलशानने फटकेबाजी करत लंकेला विजय मिळवून दिला. तीन टेस्टच्या सीरिजमध्ये भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 22, 2010 04:39 PM IST

गॉल टेस्ट श्रीलंकेच्या खिशात

22 जुलै

श्रीलंकन टीमने अखेर गॉल टेस्ट दहा विकेट राखून जिंकली आहे. भारताने समोर ठेवलेले 95 रन्सचे आव्हान त्यांनी पंधराव्या ओव्हरमध्येच पार केले.

या टेस्ट विजयासह लंकन टीमसाठी आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे मुथय्या मुरलीधरनने आपल्या शेवटच्या टेस्टमध्ये 800 टेस्ट विकेट्स पूर्ण केल्या. आज दुपारी प्रग्यान ओझाची घेतलेली विकेट त्याची 800वी रेकॉर्ड विकेट ठरली. टेस्टमध्ये 800 विकेट घेणारा तो पहिला बॉलर ठरला आहे.

भारताच्या दुसर्‍या इनिंगमध्ये त्याने एकूण तीन विकेट घेतल्या. भारताची दुसरी इनिंग आज 338 रन्समध्ये आटोपली. आज लक्ष्मणने 69 रन्स केले. आणि ईशांत शर्मा, प्रग्यान ओझा या शेवटच्या जोडीने दोन तास किल्ला लढवत हाफ सेंच्युरी पार्टनरशिप केली.

त्यामुळे भारताने लंकेसमोर विजयासाठी 95 रन्स करण्याचं आव्हान ठेवले. पण दिलशानने फटकेबाजी करत लंकेला विजय मिळवून दिला. तीन टेस्टच्या सीरिजमध्ये भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2010 04:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close