S M L

मुंबईत पावसाचा जोर कायम

24 जुलैराज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे तर गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरातही पावसाची संततधार कायम आहे. सकाळी थोडी विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा मुसळधार बरसत आहे तर काही ठिकाणी कधी रिमझिम तर कधी जोरदार सरी बरसत आहे. गेल्या 24 तासांत शहरात 22.6 मिमी तर उपनगरात 37.2 आणि पश्चिम उपनगरात 20.4 मिमी पाऊस झाला. समुद्राला भरती असल्यामुळे समुद्रात पोहायला जाऊ नये असं आवाहन करण्यात आले आहे. मात्र रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. दरम्यान, कल्याण आणि अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पालिकेच्या शाळा सोडण्यात आल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 24, 2010 12:57 PM IST

मुंबईत पावसाचा जोर कायम

24 जुलै

राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे तर गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरातही पावसाची संततधार कायम आहे. सकाळी थोडी विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा मुसळधार बरसत आहे तर काही ठिकाणी कधी रिमझिम तर कधी जोरदार सरी बरसत आहे. गेल्या 24 तासांत शहरात 22.6 मिमी तर उपनगरात 37.2 आणि पश्चिम उपनगरात 20.4 मिमी पाऊस झाला.

समुद्राला भरती असल्यामुळे समुद्रात पोहायला जाऊ नये असं आवाहन करण्यात आले आहे. मात्र रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. दरम्यान, कल्याण आणि अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पालिकेच्या शाळा सोडण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2010 12:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close