S M L

अकोले शहरात कर्फ्यू ,500 जणांवर गुन्हा दाखल

24 जुलैअहमदनगरमधील अकोले इथं पोलीस स्टेशनवरील हल्ल्याप्रकरणी 500 जणांवर गुन्हा दाखल झाला.तर रविवारी दिवसभर कर्फ्यू लागू राहणार आहे. मात्र सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत 3 तास कर्फ्यू शिथिल करणार आहे.अकोले पोलीस स्टेशनचे पीआय रवींद्र तायडे यांची अहमदनगरला पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली.पोलिसांनी तिथल्या एका जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकली होती. या गोष्टीचा राग येऊन मच्छिंद्र धुमाळ या शिवसेना तालुकाप्रमुखाने अकोले पोलीस स्टेशनमध्ये धुमाकूळ घातला होता. पोलीस स्टेशनमध्ये घुसून शिवसैनिकांनी पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांना मारहाण केली, तसेच पोलीस स्टेशनच्या आवारातील वाहनांचीही तोडफोड केली. काही पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळही करण्यात आली. परिणामी शहरात कर्फ्यू घोषित करण्यात आला. अकोले पोलीस स्टेशनसमोरच सकाळी एक मृतदेहही आढळला. डोक्याला मार लागल्यानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून कालच्या दगडफेकीत हा मृत्यू झाल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. दरम्यान, काल पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या प्रकरणात आपली काही चूक नसून उलट पोलिसांनीचआपल्याला मारहाण केल्याचा आरोप शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी केला आहे.याप्रकरणी 500 जणांविरोधातगुन्हा दाखल करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 24, 2010 01:28 PM IST

अकोले शहरात कर्फ्यू ,500 जणांवर गुन्हा दाखल

24 जुलै

अहमदनगरमधील अकोले इथं पोलीस स्टेशनवरील हल्ल्याप्रकरणी 500 जणांवर गुन्हा दाखल झाला.

तर रविवारी दिवसभर कर्फ्यू लागू राहणार आहे. मात्र सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत 3 तास कर्फ्यू शिथिल

करणार आहे.

अकोले पोलीस स्टेशनचे पीआय रवींद्र तायडे यांची अहमदनगरला पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली.

पोलिसांनी तिथल्या एका जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकली होती. या गोष्टीचा राग येऊन मच्छिंद्र धुमाळ या

शिवसेना तालुकाप्रमुखाने अकोले पोलीस स्टेशनमध्ये धुमाकूळ घातला होता. पोलीस स्टेशनमध्ये घुसून

शिवसैनिकांनी पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांना मारहाण केली, तसेच पोलीस स्टेशनच्या आवारातील

वाहनांचीही तोडफोड केली. काही पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळही करण्यात आली.

परिणामी शहरात कर्फ्यू घोषित करण्यात आला. अकोले पोलीस स्टेशनसमोरच सकाळी एक मृतदेहही आढळला.

डोक्याला मार लागल्यानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून कालच्या दगडफेकीत हा मृत्यू

झाल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, काल पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या प्रकरणात आपली काही चूक नसून उलट पोलिसांनीच

आपल्याला मारहाण केल्याचा आरोप शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी केला आहे.

याप्रकरणी 500 जणांविरोधातगुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2010 01:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close