S M L

सचिनच्या पुस्तकात रक्ताचा थेंब नसणार

24 जुलैभारताचा लाडका क्रिकेटर सचिन तेंडुलकर याच्यावर 'सचिन ओपस' हे खास पुस्तक प्रसिद्ध होणार आहे. या पुस्तकाच्या पहिल्या पानावर सचिनच्या रक्ताचा थेंब असणार अशी घोषणाही करण्यात आली होती. मात्र यात रक्त नसेल असं स्पष्टीकरण स्वत: सचिन तेंडुलकरनं केलं आहे.काही दिवसांपुर्वी सचिन तेंडुलकर याच्यावर 'सचिन ओपस' हे खास पुस्तक प्रसिद्ध होणार आणि या पुस्तकाचं एक पान पेपरपल्प आणि चक्क सचिनचं रक्त वापरून तयार करण्यात येईल असं प्रकाशकांनी घोषित केले होते, त्यामुळे या पुस्तकाची किंमत 32 लाख रुपये ठेवण्यात आली होती.सचिनच्या दहा फॅन्सनी या पुस्तकाची नोंदणीही केली. मात्र आता सचिनने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे खळबळ उडाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 24, 2010 01:43 PM IST

सचिनच्या पुस्तकात रक्ताचा थेंब नसणार

24 जुलै

भारताचा लाडका क्रिकेटर सचिन तेंडुलकर याच्यावर 'सचिन ओपस' हे खास पुस्तक प्रसिद्ध होणार आहे. या पुस्तकाच्या पहिल्या पानावर सचिनच्या रक्ताचा थेंब असणार अशी घोषणाही करण्यात आली होती. मात्र यात रक्त नसेल असं स्पष्टीकरण स्वत: सचिन तेंडुलकरनं केलं आहे.

काही दिवसांपुर्वी सचिन तेंडुलकर याच्यावर 'सचिन ओपस' हे खास पुस्तक प्रसिद्ध होणार आणि या पुस्तकाचं एक पान पेपरपल्प आणि चक्क सचिनचं रक्त वापरून तयार करण्यात येईल असं प्रकाशकांनी घोषित केले होते, त्यामुळे या पुस्तकाची किंमत 32 लाख रुपये ठेवण्यात आली होती.

सचिनच्या दहा फॅन्सनी या पुस्तकाची नोंदणीही केली. मात्र आता सचिनने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे खळबळ उडाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2010 01:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close