S M L

'जेलमध्ये सालेमची बडदास्त'

26 जुलैमुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये असलेला अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांना आर्थर रोड तुरूंगात आलीशान सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचा आरोप खुद्द कारागृह खात्याचे गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी केला आहे. बागवेंच्या या आरोपामुळे खळबळ माजली आहे. अबू सालेमवर आर्थर रोड जेलमध्ये हल्ला झाल्यानंतर गृहराज्यमंत्री बागवे यांनी अचानक आर्थर रोड जेलला भेट दिली. त्यावेळी तेथील अनेक त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्या. सालेमवर धार-धार चमच्याने हल्ला करण्यात आला होता. मुळात जेलमध्ये मेटल डिटेक्टर असताना डोसाकडे चमचा आला तरी कसा हा प्रश्नही आहे. डोसाच्या बॅरेकमध्ये जेवणाचा मोठा डबाही होता. अनेक दिवस पुरेल इतकी फळे, खाद्यपदार्थही त्यात होते. कैद्यांच्या खाद्यपदार्थांबाबत जेलचे नियम असले तरी आर्थर रोड तुरूंगात त्याचे सर्रास उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. सालेमच्या खोलीतही पंचतारांकित थाट दिसत होता. सालेम 10 नंबरच्या बॅरेकमध्ये होता. तिथे तर मॉडेलची अश्लिल पोस्टर्सही होती. सालेमचे अनेक शौक तुरूंगातील अधिकारी पुरवत होते हेच यावरून स्पष्ट झाले. सालेम, डोसाच्या सुरक्षाव्यवस्थेत उणिवा होत्या. त्यामुळे आर्थर रोड जेलची सुरक्षाव्यवस्था कमकुवत आहे हेदेखील दिसून आले. तसेच तुरूंगातील अधिकारी हायप्रोफाईल कैद्यांची कशी बडदास्त ठेवतात, तेदेखील दिसून आले. आता रमेश बागवे यांच्या विधानाचे पडसाद सभागृहातही उमटले आहेत. एकनाथ खडसे यांनी आर्थर रोड जेलच्या सुरक्षे संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 26, 2010 09:26 AM IST

'जेलमध्ये सालेमची बडदास्त'

26 जुलै

मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये असलेला अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांना आर्थर रोड तुरूंगात आलीशान सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचा आरोप खुद्द कारागृह खात्याचे गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी केला आहे. बागवेंच्या या आरोपामुळे खळबळ माजली आहे.

अबू सालेमवर आर्थर रोड जेलमध्ये हल्ला झाल्यानंतर गृहराज्यमंत्री बागवे यांनी अचानक आर्थर रोड जेलला भेट दिली. त्यावेळी तेथील अनेक त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्या. सालेमवर धार-धार चमच्याने हल्ला करण्यात आला होता. मुळात जेलमध्ये मेटल डिटेक्टर असताना डोसाकडे चमचा आला तरी कसा हा प्रश्नही आहे.

डोसाच्या बॅरेकमध्ये जेवणाचा मोठा डबाही होता. अनेक दिवस पुरेल इतकी फळे, खाद्यपदार्थही त्यात होते. कैद्यांच्या खाद्यपदार्थांबाबत जेलचे नियम असले तरी आर्थर रोड तुरूंगात त्याचे सर्रास उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. सालेमच्या खोलीतही पंचतारांकित थाट दिसत होता. सालेम 10 नंबरच्या बॅरेकमध्ये होता. तिथे तर मॉडेलची अश्लिल पोस्टर्सही होती. सालेमचे अनेक शौक तुरूंगातील अधिकारी पुरवत होते हेच यावरून स्पष्ट झाले.

सालेम, डोसाच्या सुरक्षाव्यवस्थेत उणिवा होत्या. त्यामुळे आर्थर रोड जेलची सुरक्षाव्यवस्था कमकुवत आहे हेदेखील दिसून आले. तसेच तुरूंगातील अधिकारी हायप्रोफाईल कैद्यांची कशी बडदास्त ठेवतात, तेदेखील दिसून आले. आता रमेश बागवे यांच्या विधानाचे पडसाद सभागृहातही उमटले आहेत. एकनाथ खडसे यांनी आर्थर रोड जेलच्या सुरक्षे संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2010 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close