S M L

पुणेकरांना होणार दररोज पाणीपुरवठा

26 जुलैपुण्याला एकदिवसाआड होत असलेला पाणी पुरवठा रद्द करण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना आता रोज पाणी पुरवठा होणार आहे. गेल्या आठवड्यापासून पुण्यात एकदिवसाआड पाणीपुरवठा होत होता. पावसाने दडी मारल्यानंतर आणि पुण्याच्या धरणांमधील पाणीसाठा संपत आल्यामुळे गेल्या आठवड्यात पुण्यात एकदिवसाआड पाणी पुरवठा सुरू झाला. मात्र आता धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस पडल्याने पाणी पुरवठा दररोज होणार आहे. पण पुणेकरांना पूर्वी दिवसातून दोन वेळा होणारा पाणी पुरवठा आता एकाच वेळी होणार आहे. त्यामुळे पाणी कपात रद्द न करता नियोजनात बदल करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 26, 2010 12:09 PM IST

पुणेकरांना होणार दररोज पाणीपुरवठा

26 जुलै

पुण्याला एकदिवसाआड होत असलेला पाणी पुरवठा रद्द करण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना आता रोज पाणी पुरवठा होणार आहे.

गेल्या आठवड्यापासून पुण्यात एकदिवसाआड पाणीपुरवठा होत होता. पावसाने दडी मारल्यानंतर आणि पुण्याच्या धरणांमधील पाणीसाठा संपत आल्यामुळे गेल्या आठवड्यात पुण्यात एकदिवसाआड पाणी पुरवठा सुरू झाला.

मात्र आता धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस पडल्याने पाणी पुरवठा दररोज होणार आहे. पण पुणेकरांना पूर्वी दिवसातून दोन वेळा होणारा पाणी पुरवठा आता एकाच वेळी होणार आहे. त्यामुळे पाणी कपात रद्द न करता नियोजनात बदल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2010 12:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close