S M L

दलित महिलेची धिंड काढणार्‍या आरोपींची सुटका

26 जुलै मुंबईतील रे रोड इथे एका 22 वर्षीय दलित तरुणीची 17 जूनला नग्न धिंड काढण्यात आली होती. या घटनेची गंभीर दखल घेत 12 जणांना अटक झाली होती. यातील 11 आरोपींची आज जामिनावर सुटका करण्यात आली. 12 जणांवर याप्रकरणी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी एका आरोपीची आधीच जामिनावर सुटका करण्यात आली होती. तर 11 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या 11 जणांना आज सेशन कोर्टात जामीन मंजूर करण्यात आला. या भागातील शिवसेनेची गटप्रमुख शारदा यादव हिने काही जणांसोबत या मुलीच्या आईला आणि या मुलीला मारहाण केली. तसेच तिची नग्न धिंड काढली होती, असा आरोप करण्यात आला. शारदा यादव आणि पीडित मुलीच्या घरच्यांमध्ये पाण्यावरुन वाद होत असत. त्याचाच राग मनात धरुन भावाच्या अटकेचे निमित्त करत शारदा यादवने हा प्रकार केल्याचा आरोप पीडित मुलीच्या भावाने केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 26, 2010 12:32 PM IST

दलित महिलेची धिंड काढणार्‍या आरोपींची सुटका

26 जुलै

मुंबईतील रे रोड इथे एका 22 वर्षीय दलित तरुणीची 17 जूनला नग्न धिंड काढण्यात आली होती. या घटनेची गंभीर दखल घेत 12 जणांना अटक झाली होती. यातील 11 आरोपींची आज जामिनावर सुटका करण्यात आली.

12 जणांवर याप्रकरणी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी एका आरोपीची आधीच जामिनावर सुटका करण्यात आली होती. तर 11 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या 11 जणांना आज सेशन कोर्टात जामीन मंजूर करण्यात आला.

या भागातील शिवसेनेची गटप्रमुख शारदा यादव हिने काही जणांसोबत या मुलीच्या आईला आणि या मुलीला मारहाण केली. तसेच तिची नग्न धिंड काढली होती, असा आरोप करण्यात आला.

शारदा यादव आणि पीडित मुलीच्या घरच्यांमध्ये पाण्यावरुन वाद होत असत. त्याचाच राग मनात धरुन भावाच्या अटकेचे निमित्त करत शारदा यादवने हा प्रकार केल्याचा आरोप पीडित मुलीच्या भावाने केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2010 12:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close