S M L

नाशकात गोदावरीचे प्रदूषण

26 जुलैनाशिकमध्ये गोदावरीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. गोदावरीच्या रामकुंडापासून नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात फेसाळलेलं पाणी वाहत आहे. तसेच या पाण्याला बरीच दुर्गंधीही येत आहे. नागरिकांनी याबद्दल तक्रारी केल्यावर महापालिका आयुक्तांनी नदी पात्राची पाहणी केली. प्रदूषण कशामुळे झाले असावे याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडून मागवला असल्याचे छापील उत्तर त्यांनी दिले आहे. गोदावरीतील प्रदूषणाबद्दल महापालिका प्रशासन आणि प्रदूषण महामंडळ कायमच उथळ भूमिका घेत आले आहे.दरम्यान, गोदावरी पात्रात ड्रेनेजचे पाणी मिसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 26, 2010 12:39 PM IST

नाशकात गोदावरीचे प्रदूषण

26 जुलै

नाशिकमध्ये गोदावरीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे.

गोदावरीच्या रामकुंडापासून नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात फेसाळलेलं पाणी वाहत आहे. तसेच या पाण्याला बरीच दुर्गंधीही येत आहे. नागरिकांनी याबद्दल तक्रारी केल्यावर महापालिका आयुक्तांनी नदी पात्राची पाहणी केली.

प्रदूषण कशामुळे झाले असावे याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडून मागवला असल्याचे छापील उत्तर त्यांनी दिले आहे. गोदावरीतील प्रदूषणाबद्दल महापालिका प्रशासन आणि प्रदूषण महामंडळ कायमच उथळ भूमिका घेत आले आहे.

दरम्यान, गोदावरी पात्रात ड्रेनेजचे पाणी मिसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2010 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close