S M L

'पुन्हा सही रे सही' वादात

26 जुलैलेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांचे भरत जाधव याची प्रमुख भूमिका असलेले सही रे सही हे नाटक प्रचंड गाजले होते. केदार शिंदे यांचे हे नाटक श्री चिंतामणी नाट्य संस्थेतर्फे रंगभूमीवर आले होते. पण 8 महिन्यांपूर्वी हे नाटक श्री चिंतामणी नाट्यसंस्थेने बंद केले. याची कोणतीही पूर्वकल्पना आपल्याला दिली गेली नव्हती, असे दिग्दर्शक केदार शिंदेंचे म्हणणे आहे. त्यामुळे आता हेच नाटक केदार शिंदे सुयोग नाट्य संस्थेसोबत पुन्हा एकदा रंगभूमीवर आणत आहेत. या नाटकाचा पहिला प्रयोग 1 ऑगस्टला पुण्यात होणार आहे.पण आता याला श्री चिंतामणी नाट्य संस्थेच्या लता नार्वेकरांनी आक्षेप घेतला आहे. या विरोधात नार्वेकरांनी आता कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे 1 ऑगस्टला सही रे सही रंगमंचावर येणार की नाही, यासाठी सामान्य रसिकांच्या नजरा हाय कोर्ट काय निर्णय देते, याकडे लागल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 26, 2010 01:16 PM IST

'पुन्हा सही रे सही' वादात

26 जुलै

लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांचे भरत जाधव याची प्रमुख भूमिका असलेले सही रे सही हे नाटक प्रचंड गाजले होते. केदार शिंदे यांचे हे नाटक श्री चिंतामणी नाट्य संस्थेतर्फे रंगभूमीवर आले होते. पण 8 महिन्यांपूर्वी हे नाटक श्री चिंतामणी नाट्यसंस्थेने बंद केले.

याची कोणतीही पूर्वकल्पना आपल्याला दिली गेली नव्हती, असे दिग्दर्शक केदार शिंदेंचे म्हणणे आहे. त्यामुळे आता हेच नाटक केदार शिंदे सुयोग नाट्य संस्थेसोबत पुन्हा एकदा रंगभूमीवर आणत आहेत. या नाटकाचा पहिला प्रयोग 1 ऑगस्टला पुण्यात होणार आहे.

पण आता याला श्री चिंतामणी नाट्य संस्थेच्या लता नार्वेकरांनी आक्षेप घेतला आहे. या विरोधात नार्वेकरांनी आता कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे 1 ऑगस्टला सही रे सही रंगमंचावर येणार की नाही, यासाठी सामान्य रसिकांच्या नजरा हाय कोर्ट काय निर्णय देते, याकडे लागल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2010 01:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close