S M L

मुंबईची पाणी टंचाई मिटणार

27 जुलैमुंबईला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर, तुळशी आणि विहार हे तीन तलाव भरुन वाहू लागले आहेत. आता तानसा आणि भातसा ही दोन धरणे ओव्हरफ्लो झाली की, मुंबईत लागू असलेली 15 टक्के पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती बीएमसीच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी आज दिली. शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन धरणांच्या साठ्यात चांगली वाढ झाली तर 15 ऑगस्टच्या आधी पाणीकपात रद्द केली जाईल. मान्सूनच्या आगमनापासून गेला दीड महिना तलाव परिसरात चांगला पाऊस झाला आहे. तुळशी तलाव आज सकाळी सहा वाजता भरुन वाहू लागला. तर मोडक सागर सकाळी आठ वाजता भरून वाहू लागला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 27, 2010 02:48 PM IST

मुंबईची पाणी टंचाई मिटणार

27 जुलै

मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर, तुळशी आणि विहार हे तीन तलाव भरुन वाहू लागले आहेत.

आता तानसा आणि भातसा ही दोन धरणे ओव्हरफ्लो झाली की, मुंबईत लागू असलेली 15 टक्के पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती बीएमसीच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी आज दिली.

शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन धरणांच्या साठ्यात चांगली वाढ झाली तर 15 ऑगस्टच्या आधी पाणीकपात रद्द केली जाईल. मान्सूनच्या आगमनापासून गेला दीड महिना तलाव परिसरात चांगला पाऊस झाला आहे.

तुळशी तलाव आज सकाळी सहा वाजता भरुन वाहू लागला. तर मोडक सागर सकाळी आठ वाजता भरून वाहू लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2010 02:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close