S M L

कचरा कंपनीकडून औरंगाबाद महापालिकेची फसवणूक

28 जुलैतोट्यात असलेल्या औरंगाबाद महापालिकेला पुन्हा एक झटका बसला आहे. शहरातील कचरा उचलण्यासाठी दहा महिन्यांपूर्वी रॅम्की कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. पण अजबच झाले. रॅम्की कंपनीकडून कचरा उचलण्यासाठी चक्क महापालिकेच्या कर्मचार्‍यांना वापरण्यात आले. तेही महापालिकेच्या पैशातून...महापालिकेच्या या असलेल्या पण रॅम्कीकडे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना 40 लाख रुपये पगार देण्यात आला, तोही महापालिकेच्या तिजोरीतून. ही बाब आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या लक्षात आल्यानंतर चौकशी सुरु झाली. रॅम्कीकडे काम करण्यासाठी या कर्मचार्‍यांना कुणी पाठवले आणि त्यांच्याकडे काम करीत असताना महापालिकेच्या तिजीरीतून पगार कसा दिला गेला, याची चौकशी आता करण्यात येत आहे. 103 कर्मचार्‍यांना दिलेले 40 लाख रुपये आता रॅम्कीने महापालिकेला द्यावेत, अशी मागणी महापौर अनिता घोडेले यांनी केली आहे. मात्र कचरा उचलण्यासाठी कुचराई करणार्‍या रॅम्की आणि महापालिकेमध्ये 40 लाखांवरुन वाद सुरु झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 28, 2010 11:56 AM IST

कचरा कंपनीकडून औरंगाबाद महापालिकेची फसवणूक

28 जुलै

तोट्यात असलेल्या औरंगाबाद महापालिकेला पुन्हा एक झटका बसला आहे. शहरातील कचरा उचलण्यासाठी दहा महिन्यांपूर्वी रॅम्की कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. पण अजबच झाले. रॅम्की कंपनीकडून कचरा उचलण्यासाठी चक्क महापालिकेच्या कर्मचार्‍यांना वापरण्यात आले. तेही महापालिकेच्या पैशातून...

महापालिकेच्या या असलेल्या पण रॅम्कीकडे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना 40 लाख रुपये पगार देण्यात आला, तोही महापालिकेच्या तिजोरीतून. ही बाब आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या लक्षात आल्यानंतर चौकशी सुरु झाली.

रॅम्कीकडे काम करण्यासाठी या कर्मचार्‍यांना कुणी पाठवले आणि त्यांच्याकडे काम करीत असताना महापालिकेच्या तिजीरीतून पगार कसा दिला गेला, याची चौकशी आता करण्यात येत आहे.

103 कर्मचार्‍यांना दिलेले 40 लाख रुपये आता रॅम्कीने महापालिकेला द्यावेत, अशी मागणी महापौर अनिता घोडेले यांनी केली आहे. मात्र कचरा उचलण्यासाठी कुचराई करणार्‍या रॅम्की आणि महापालिकेमध्ये 40 लाखांवरुन वाद सुरु झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 28, 2010 11:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close