S M L

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्‍याचा मृत्यू

28 जुलैपुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वडगाव-काशिंबेग गावात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एका शेतकर्‍याला जीव गमवावा लागला आहे. विद्युत वाहिनीची तुटलेली तार चार दिवस होऊनही महावितरणने दुरूस्त केली नाही. याच तारेचा शॉक लागून दत्तात्रय भैय्ये या 23 वर्षीय तरूण शेतकर्‍याचा मृत्यू झाला. महावितरणने यासंबंधी मदत देण्यास टाळाटाळ केल्याने अखेर ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी मंचर येथील महावितरणच्या ऑफिसात मृतदेहासह धरणे आंदोलन सुरू केले. अधिकार्‍यांनी अखेर मदतीची ग्वाही दिल्यावरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 28, 2010 01:25 PM IST

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्‍याचा मृत्यू

28 जुलै

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वडगाव-काशिंबेग गावात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एका शेतकर्‍याला जीव गमवावा लागला आहे.

विद्युत वाहिनीची तुटलेली तार चार दिवस होऊनही महावितरणने दुरूस्त केली नाही. याच तारेचा शॉक लागून दत्तात्रय भैय्ये या 23 वर्षीय तरूण शेतकर्‍याचा मृत्यू झाला.

महावितरणने यासंबंधी मदत देण्यास टाळाटाळ केल्याने अखेर ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी मंचर येथील महावितरणच्या ऑफिसात मृतदेहासह धरणे आंदोलन सुरू केले.

अधिकार्‍यांनी अखेर मदतीची ग्वाही दिल्यावरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 28, 2010 01:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close