S M L

फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये भारत सहावा

शची मराठे, मुंबई 28 जुलै41वं आंतरराष्ट्रीय फिजिक्स ऑलिम्पियाड नुकतेच क्रोएशिया येथे पार पडले. 82 देशांनी भाग घेतलेल्या या स्पर्धेत भारताने सहावे स्थान पटकावले. तर मुंबईच्या आकांक्षा सारडाने मुलींमधून गोल्ड मेडल पटकावले आहे. आकांक्षाला गोल्ड मेडल, शिवम, विपुल आणि मेहुल या तिघांना सिल्व्हर मेडल तर संचारला ब्रॉझ मेडल मिळाले. हे पाचही जण नुकतेच भारतात परतले. यात गोल्डमेडल मिळवणारी आकांशा पहिलीच भारतीय मुलगी आहे. मेडलपेक्षा भारताचे प्रतिनिधीत्त्व करायला मिळणे याचेच तिला अप्रूप वाटत आहे. होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशनतर्फे दरवर्षी भारताची टीम फिजिक्स ऑलिम्पियाडसाठी पाठवण्यात येते. टीममधील प्रत्येकाचा स्पर्धेतील वैयक्तिक आणि एकत्रीत रँक मोजून त्या त्या देशाचे मार्क ठरविण्यात येतात. 82 देशांमधून चीनच्या मुलांनी ही स्पर्धा जिंकली. आणि भारताने पटकावला सहावा नंबर...

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 28, 2010 01:39 PM IST

फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये भारत सहावा

शची मराठे, मुंबई

28 जुलै

41वं आंतरराष्ट्रीय फिजिक्स ऑलिम्पियाड नुकतेच क्रोएशिया येथे पार पडले. 82 देशांनी भाग घेतलेल्या या स्पर्धेत भारताने सहावे स्थान पटकावले. तर मुंबईच्या आकांक्षा सारडाने मुलींमधून गोल्ड मेडल पटकावले आहे.

आकांक्षाला गोल्ड मेडल, शिवम, विपुल आणि मेहुल या तिघांना सिल्व्हर मेडल तर संचारला ब्रॉझ मेडल मिळाले. हे पाचही जण नुकतेच भारतात परतले. यात गोल्डमेडल मिळवणारी आकांशा पहिलीच भारतीय मुलगी आहे. मेडलपेक्षा भारताचे प्रतिनिधीत्त्व करायला मिळणे याचेच तिला अप्रूप वाटत आहे.

होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशनतर्फे दरवर्षी भारताची टीम फिजिक्स ऑलिम्पियाडसाठी पाठवण्यात येते. टीममधील प्रत्येकाचा स्पर्धेतील वैयक्तिक आणि एकत्रीत रँक मोजून त्या त्या देशाचे मार्क ठरविण्यात येतात.

82 देशांमधून चीनच्या मुलांनी ही स्पर्धा जिंकली. आणि भारताने पटकावला सहावा नंबर...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 28, 2010 01:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close