S M L

नाशिकमध्ये गोदावरी नदी बनली कचर्‍याची कुंडी

29 जुलैदीप्ती राऊत, नाशिक नाशिकला ओळख दिली ती गोदावरी नदीने. पण सध्या ही पवित्र गोदावरी कचर्‍याची कुंडी बनली आहे. नाशिकचे भूषण समजला जाणारा गंगाघाट स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी काही तरुण आर्किटेक्ट झटत आहेत.या तरुणांनी "कॉज ... इनिशिएटीव्ह फॉर नाशिक" नावाचा ग्रुप तयार केला. या माध्यमातून त्यांनी सहा महिने पाच हजार तास गंगाघाटाचा कोपरा न कोपरा शोधला. त्या परिसराचा अभ्यास केला.आणि त्यातून तयार झाला रामकुंडाच्या स्वच्छतेचा आणि सुशोभीकरणाचा आराखडा. तेथील प्रत्येक विधीची गरज लक्षात घेणारा, प्रत्येक व्यक्तिची मानसिकता समजणारा...महापालिकेकडे उपलब्ध साधने आणि मनुष्यबळ यातच त्यांनी हा प्लॅन तयार केला आहे. उर्जा प्रतिष्ठानने त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.आता गरज आहे महापालिकेच्या पुढाकाराची...

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 29, 2010 10:47 AM IST

नाशिकमध्ये गोदावरी नदी बनली कचर्‍याची कुंडी

29 जुलै

दीप्ती राऊत, नाशिक

नाशिकला ओळख दिली ती गोदावरी नदीने. पण सध्या ही पवित्र गोदावरी कचर्‍याची कुंडी बनली आहे. नाशिकचे भूषण समजला जाणारा गंगाघाट स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी काही तरुण आर्किटेक्ट झटत आहेत.

या तरुणांनी "कॉज ... इनिशिएटीव्ह फॉर नाशिक" नावाचा ग्रुप तयार केला. या माध्यमातून त्यांनी सहा महिने पाच हजार तास गंगाघाटाचा कोपरा न कोपरा शोधला. त्या परिसराचा अभ्यास केला.

आणि त्यातून तयार झाला रामकुंडाच्या स्वच्छतेचा आणि सुशोभीकरणाचा आराखडा. तेथील प्रत्येक विधीची गरज लक्षात घेणारा, प्रत्येक व्यक्तिची मानसिकता समजणारा...

महापालिकेकडे उपलब्ध साधने आणि मनुष्यबळ यातच त्यांनी हा प्लॅन तयार केला आहे. उर्जा प्रतिष्ठानने त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

आता गरज आहे महापालिकेच्या पुढाकाराची...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 29, 2010 10:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close