S M L

'सही रे सही'चा निकाल 'सुयोग'च्या बाजूने

29 जुलैलेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांचं भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असलेल्या सही रे सही या नाटकावर सध्या प्रचंड वाद सुरू आहेत. हा वाद कोर्टात गेल्यानंतर दोन दिवस त्यावर विचार करायला कोर्टानं वेळ घेतला आणि आज सुयोगच्या बाजूने हा निकाल दिला.निकालाच्या वेळी कोर्टात सुधीर भट, केदार शिंदे, लता नार्वेकर हजर होते. सही रे सही नाटक यापूर्वी लता नार्वेकर यांच्या श्री चिंतामणी या संस्थेतर्फे केले जात होते.पण लता नार्वेकर आणि अभिनेता भरत जाधव यांच्यामधील मतभेदामुळे हे नाटक गेले 8 महिने बंद होते. यानंतर केदार शिंदे यांनी हे नाटक पुन्हा सही रे सही या नावाने पुन्हा नव्या स्वरूपात लिहिले आणि सुधीर भट यांच्या सुयोग संस्थेला याचे हक्क दिले. या नाटकाचे प्रयोग 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. यावर स्थगिती मिळवण्यासाठी लता नार्वेकर यांनी कोर्टात धाव घेतली. पण कोर्टाचा निकाल सुयोगच्या बाजूने लागला आहे. म्हणजे प्रेक्षकांना 1 ऑगस्टपासून 'पुन्हा सही रे सही'चा आनंद घेता येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 29, 2010 11:22 AM IST

'सही रे सही'चा निकाल 'सुयोग'च्या बाजूने

29 जुलै

लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांचं भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असलेल्या सही रे सही या नाटकावर सध्या प्रचंड वाद सुरू आहेत. हा वाद कोर्टात गेल्यानंतर दोन दिवस त्यावर विचार करायला कोर्टानं वेळ घेतला आणि आज सुयोगच्या बाजूने हा निकाल दिला.

निकालाच्या वेळी कोर्टात सुधीर भट, केदार शिंदे, लता नार्वेकर हजर होते. सही रे सही नाटक यापूर्वी लता नार्वेकर यांच्या श्री चिंतामणी या संस्थेतर्फे केले जात होते.

पण लता नार्वेकर आणि अभिनेता भरत जाधव यांच्यामधील मतभेदामुळे हे नाटक गेले 8 महिने बंद होते. यानंतर केदार शिंदे यांनी हे नाटक पुन्हा सही रे सही या नावाने पुन्हा नव्या स्वरूपात लिहिले आणि सुधीर भट यांच्या सुयोग संस्थेला याचे हक्क दिले.

या नाटकाचे प्रयोग 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. यावर स्थगिती मिळवण्यासाठी लता नार्वेकर यांनी कोर्टात धाव घेतली. पण कोर्टाचा निकाल सुयोगच्या बाजूने लागला आहे.

म्हणजे प्रेक्षकांना 1 ऑगस्टपासून 'पुन्हा सही रे सही'चा आनंद घेता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 29, 2010 11:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close