S M L

कोल्हापुरातील पूरपातळीत घट

30 जुलैकोल्हापूर जिल्ह्यात पूरपातळी ओसरत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 42 फूट 2 इंचावरून आता 41 फूट 8 इंचावर आली आहे. राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे बंद झालेत. त्यामुळे धरणातून सध्या 8 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यातील 54 गावांचा संपर्क अंशता: तुटला असून त्यांना पुराचा विळखा कायम आहे. पण तिथे पर्यायी वाहतूक सुरू आहे. पावसानेही उघडीप दिल्याने पाणीपातळीत घट झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात अजूनही 70 बंधारे आणि 53 मार्ग पाण्याखाली आहेत. पुण्यात संततधारपुण्यातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे गेले काही दिवस पाणीकपातीच्या सावटाखाली असलेले पुणेकरही पावसामुळे सुखावले आहेत. पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमध्ये पाणीपातळी वाढली आहे.पुण्याचे खडकवासला धरण भरून वाहत आहे. धरणातून 2 हजार 500 क्युसेक्स पाणी सोडले. एक नजर टाकूया धरणांतील पाणीसाठ्यावर - खडकवासला - 100 टक्केपानशेत धरण - 39.22 टक्केवरसगाव - 29.87 टक्के टेमघर - 26 टक्के किनवटमध्ये पूरस्थितीनांदेडमध्ये पहाटेपासून पाऊस सुरू असून पैनगंगेचे पाणी किनवट शहरात घुसले आहे. रेल्वे ट्रॅकची जमीन खचली त्यामुळे नंदीग्राम एक्स्प्रेस खोळंबळी. इस्लापूर-किनवट रस्ता बंद आहे. विष्णूपुरी धरणाचा एक दरवाजा उघडला आहे. दोन वर्षातून पहिल्यांदाच विष्णूपुरी धरण 45 टक्के भरले आहे. किनवट शहरात पैनगंगेचे पाणी शिरले आहे. 200 कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. या लोकांना जिल्हा परिषदेची शाळा आणि समाजमंदिरात ठेवण्यात आले आहे.वर्ध्यात नदी नाले तुडुंबवर्धा जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले तुंडुब भरून वाहत आहेत. हिंगणघाट तालुक्यात लाल नाला प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. समुद्रपूर तालुक्यात वीज पडून एक महिला ठार झाली आहे. आर्वी तालुक्यातील अंतरडोह-निंबोली या वर्धा नदी काठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.अंतरडोह गावातील ग्रामस्थांना स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 30, 2010 12:58 PM IST

कोल्हापुरातील पूरपातळीत घट

30 जुलै

कोल्हापूर जिल्ह्यात पूरपातळी ओसरत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 42 फूट 2 इंचावरून आता 41 फूट 8 इंचावर आली आहे. राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे बंद झालेत. त्यामुळे धरणातून सध्या 8 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील 54 गावांचा संपर्क अंशता: तुटला असून त्यांना पुराचा विळखा कायम आहे. पण तिथे पर्यायी वाहतूक सुरू आहे. पावसानेही उघडीप दिल्याने पाणीपातळीत घट झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात अजूनही 70 बंधारे आणि 53 मार्ग पाण्याखाली आहेत.

पुण्यात संततधार

पुण्यातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे गेले काही दिवस पाणीकपातीच्या सावटाखाली असलेले पुणेकरही पावसामुळे सुखावले आहेत. पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमध्ये पाणीपातळी वाढली आहे.पुण्याचे खडकवासला धरण भरून वाहत आहे. धरणातून 2 हजार 500 क्युसेक्स पाणी सोडले.

एक नजर टाकूया धरणांतील पाणीसाठ्यावर -

खडकवासला - 100 टक्के

पानशेत धरण - 39.22 टक्के

वरसगाव - 29.87 टक्के

टेमघर - 26 टक्के

किनवटमध्ये पूरस्थिती

नांदेडमध्ये पहाटेपासून पाऊस सुरू असून पैनगंगेचे पाणी किनवट शहरात घुसले आहे. रेल्वे ट्रॅकची जमीन खचली त्यामुळे नंदीग्राम एक्स्प्रेस खोळंबळी.

इस्लापूर-किनवट रस्ता बंद आहे. विष्णूपुरी धरणाचा एक दरवाजा उघडला आहे. दोन वर्षातून पहिल्यांदाच विष्णूपुरी धरण 45 टक्के भरले आहे. किनवट शहरात पैनगंगेचे पाणी शिरले आहे. 200 कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. या लोकांना जिल्हा परिषदेची शाळा आणि समाजमंदिरात ठेवण्यात आले आहे.

वर्ध्यात नदी नाले तुडुंब

वर्धा जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले तुंडुब भरून वाहत आहेत. हिंगणघाट तालुक्यात लाल नाला प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. समुद्रपूर तालुक्यात वीज पडून एक महिला ठार झाली आहे.

आर्वी तालुक्यातील अंतरडोह-निंबोली या वर्धा नदी काठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.अंतरडोह गावातील ग्रामस्थांना स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2010 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close